‘दिल, दोस्ती, डान्स’,’ये रिश्ता क्या केहलाता है’ फेम अभिनेत्री वृषिका मेहताने डिसेंबर महिन्यात बॉयफ्रेंड सौरभ घेडियाशी लग्नगाठ बांधली. वृषिकाचा पती सौरभ हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तो कॅनडामधील टोरंटोमध्ये राहतो. वृषिकाने नुकताच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने नवीन घराची झलक दाखवली आहे.

सौरभ घेडियाशी लग्नानंतर वृषिका टोरंटोला गेली आहे. तिथेच तिने पतीबरोबर नवीन घरात गृहप्रवेश केला. गृहप्रवेशाचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर ‘नवी सुरुवात’ असं कॅप्शन देत शेअर केला आहे. सर्व रीतिरिवाजांचे पालन करत वृषिकाने नवीन घरात प्रवेश केला.

प्रसिद्ध अभिनेत्रीने सॉफ्टवेअर इंजिनिअरशी केलं लग्न; सोहळ्याचे खास फोटो पाहिलेत का?

यावेळी वृषिका मेहता लाल रंगाच्या सलवार सूटमध्ये खूपच सुंदर दिसत होती. त्यांच्या लग्नासाठी आणि नव्या सुरुवातीसाठी चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. नवीन घरात जाताना अभिनेत्री डोक्यावर कलश आणि त्यावर नारळ घेऊन घरात प्रवेश केला. तर पती सौरभ हातात देवाची मूर्ती धरून असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पद्मिनी कोल्हापूरे होणार आजी, सूनेच्या डोहाळे जेवणाचे फोटो चर्चेत, श्रद्धा कपूरच्या मराठी लूकने वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by Vrushika Mehta (@vrushyy)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, वृषिका व सौभरची एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून भेट झाली आणि नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. काही वर्षे एकमेकांसह डेटिंग केल्यानंतर त्यांनी १० डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नातील फोटोंची सोशल मीडियावर खूप चर्चा होती. लग्नानंतर वृषिका पतीबरोबर कॅनडाला गेली आहे.