कलाकार मंडळींचं खासगी आयुष्य तसेच त्यांचं अफेअर कधीच कोणापासून लपून राहिलेलं नाही. आपला आवडता कलाकार कोणत्या व्यक्तीला डेट करतो हे जाणून घेण्यामध्ये चाहत्यांना अधिक रस असतो. आता अशाच एका सेलिब्रिटी कपलच्या अफेअरची जोरदार चर्चा सुरु आहे. अनन्या पांडे व आदित्य रॉय कपूर एकमेकांना डेट करत असल्याची मध्यंतरी चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा एका व्हायरल फोटोमुळे दोघांच्या नात्याबाबत बोललं जात आहे.

आणखी वाचा – “मासिक पाळीत होणारा रक्तस्राव मी लाडूमध्ये…” ‘त्या’ आरोपांबाबत कंगना रणौत स्पष्टच बोलली, काळ्या जादूबाबतही केलं भाष्य

करण जोहरने त्याच्या शोमध्ये अनन्या-आदित्य एकमेकांना डेट करत असल्याबाबात भाष्य केलं होतं. अनन्यानेही आदित्य खूप हॉट असल्याचं म्हटलं होतं. आता एका पार्टीमधील या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो पाहता दोघं खरंच एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे. पण या दोघांच्या वयामध्ये १३ वर्षाचं अंतर आहे.

अभिनेत्री क्रिती सेनॉनने आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीमध्ये बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली होती. या पार्टीला आदित्य-अनन्याही उपस्थित होते. नेहा धुपिया पती अंगद बेदीबरोबरही पार्टीला पोहोचली. यावेळी नेहा-अंगदने क्रितीबरोबर सेल्फी काढला. हा सेल्फी नेहाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा – Big Boss Marathi 4 : …अन् चक्क विकास सावंतच्या अंगावर बसली अपूर्वा नेमळेकर, व्हिडीओ तुफान व्हायरल

तिने फोटो शेअर करताच त्यांच्या पाठी उभ्या असलेल्या कपलने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. नेहाच्या या फोटोमध्ये अनन्या-आदित्य एकमेकांशी संवाद साधताना दिसत आहेत. या फोटोवरूनच दोघांमध्ये जवळीक वाढली असल्याचं दिसून येत आहे.