सोशल मीडियावर दरदिवशी अनेक जुनी गाणी व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका गाण्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘जमाने को दिखाना है’ या १९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील “होगा तुमसे प्यारा कौन…” हे गाणं सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. यामध्ये दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. सोशल मीडियावर सक्रिय असणारी तरुणाई या गाण्यावर भन्नाट रील्स व्हिडीओ बनवत आहे. अशातच सिनेविश्वातील कलाकारांना सुद्धा या गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरला नाहीये.

सध्या “होगा तुमसे प्यारा कौन…अरे हे कंचन” या ट्रेंडिंग गाण्यावर सामान्य लोकांपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत सगळेजण रील्स बनवत आहेत. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी ऐश्वर्या आणि अविनाश नारकर सुद्धा नुकतेच या गाण्यावर थिरकले आहेत. त्यांच्या जबरदस्त डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा : देशपांडे सिस्टर्सला पडली ‘हीरामंडी’ सीरिजची भुरळ! गौतमी व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आमच्या ताईजान…”

ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांची जोडी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. आजवर दोघांनी विविध नाटक, चित्रपट व मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता अभिनयाव्यतिरिक्त दोघेही विविध गाण्यांवर इन्स्टाग्राम रील्स बनवून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या “हे कंचन…” गाण्याला दीड लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा : लाडक्या आईसाठी परदेशातून आली मुलं; माधुरी दीक्षितने ‘असा’ साजरा केला वाढदिवस! डॉ. नेनेंनी शेअर केला Inside व्हिडीओ

नारकर जोडप्याच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “फिट आणि सुपरहिट जोडी इन सिने सोसायटी”,
“मस्त जमलं यावेळी… मस्त अविनाश सर”, “लय भारी”, “क्या बात है”, “मस्तच” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा : कालीन भैय्या आणि गुड्डू पंडित ‘या’ महिन्यात येणार प्रेक्षकांच्या भेटीस, ‘मिर्झापूर ३’ वेब सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाणून घ्या

ऐश्वर्या नारकरांच्या व्हिडीओवर आलेल्या कमेंट्स

दरम्यान, या दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ऐश्वर्या नारकर सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत रुपाली हे नकारात्मक पात्र साकारत आहेत. तर, अविनाश नारकरांच्या ‘कन्यादान’ मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. यामध्ये त्यांच्याशिवाय अनिषा सबनीस, संग्राम साळवी, अमृता बने, स्मितल हळदणकर, चेतन गुरव, शुभंकर एकबोटे असे अनेक कलाकार होते.