‘विठू माऊली’, ‘मन उडू उडू झालं’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अजिंक्य राऊत सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘कन्नी’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अजिंक्य पुन्हा एकदा अभिनेत्री हृता दुर्गुळेसह पाहायला मिळणार आहे. ८ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे सध्या अजिंक्य ठिकठिकाणी या चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे.
नुकतंच अजिंक्य राऊतने इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी सेशन’द्वारे चाहत्यांशी संवाद साधला. चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तर अभिनेत्याने दिली. यावेळी अजिंक्यने त्याची सध्याची क्रश किंवा गर्लफ्रेंड कोण आहे? याचा देखील खुलासा केला.
हेही वाचा – ’12th Fail’ फेम विक्रांत मेस्सीने दाखवली लेकाची पहिली झलक, जाहीर केलं नाव
एका चाहत्याने अभिनेता अजिंक्य राऊतला विचारलं की, तुझी सध्या क्रश किंवा गर्लफ्रेंड कोण आहे? तर अभिनेता म्हणाला, “माझी नवीन गाडी. पुन्हा एकदा आयुष्यात आनंदात आहोत.” काही दिवसांपूर्वी अजिंक्यने नवीन गाडी घेतल्याचं जाहीर केलं होतं. नवीन गाडीबरोबरचे फोटो आणि व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते.
हेही वाचा – पूजा सावंत लवकरच अडकणार लग्नबंधनात; संगीताची जोरदार तयारी झाली सुरू, पाहा फोटो
दरम्यान, चित्रपटाव्यतिरिक्त अजिंक्यची छोट्या पडद्यावर ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ ही मालिका सुरू आहे. या मालिकेत त्याने राजवीरची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. या भूमिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ज्याप्रमाणे ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील अजिंक्यने साकारलेल्या इंद्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं, तसंच राजवीरवर देखील करताना दिसत आहेत.