मराठी अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांनी २ डिसेंबरला लग्न केलं. या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील लोकप्रिय रील लाइफ जोडी खऱ्या आयुष्यातही लग्नाच्या बेडीत अडकली. लग्नानंतर या दोघांनी हळदी, मेहंदीपासून ते देवदर्शनापर्यंत बरेच फोटो शेअर केले आहेत. त्यानंतर आता अक्षया आणि हार्दिक यांनी त्यांच्या लग्नात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या खास व्यक्तींचेही आभार मानले आहेत.

अक्षया देवधरने तिच्या इन्स्टाग्रामवर याआधी तिची कोऑर्डिनेटर अमृताबद्दलही खास पोस्ट लिहून तिचे आभार मानले होते. त्यानंतर आता अक्षयाने तिची मॅनेजर निधीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. आपल्या या पोस्टबरोबर तिने एक व्हिडीओही पोस्ट केली आहे. ज्यात तिने निधीच्या सहकार्याशिवाय त्यांचं लग्न अशक्यच होतं असं म्हटलं आहे.

आणखी वाचा- “जिथे कमी तिथे आम्ही…” लग्नानंतर अक्षया देवधरची ‘तिच्या’साठी खास पोस्ट

अक्षयाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, “जी व्यक्ती माझ्यासोबत माझ्या लग्नाची गेले बरेच महिने तयारी करत होती, ज्या व्यक्तीमुळे काम व लग्न व्यवस्थित बॅलन्स झालं, जिच्यामुळे कोलॅब्रेशन, फोटोशूट, पाहुण्यांचं को-ऑर्डिनेशन व्यवस्थित झालं आणि हवे असलेले सर्व क्षण मला आनंदाने, कोणतीही चिंता न करता एन्जॉय करता आले, ती व्यक्ती म्हणजे निधी. मीडियाला फोटो, व्हिडीओ देण्यापासून मला व हार्दीकला कुठे काय करायचं आहे, हे सर्वच प्लान केलं. तिने सर्व खूप मनापासून केलं. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो निधी. जसं मी म्हटलं, तुझ्याशिवाय आमचं लग्न होणं अशक्य होतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली राणादा-पाठकबाईंची जोडी खऱ्या आयुष्यातही लग्नाच्या बेडीत अडकल्याने चाहतेही आनंदी आहेत. अक्षया-हार्दिकच्या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शविली होती. त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे आणि त्यानंतरचेही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.