‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी-अक्षया देवधर २ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकली. त्या दोघांनी कुटुंबीय, मित्रपरिवार व नातेवाईंकांच्या उपस्थितीत त्या दोघांनी लगीनगाठ बांधली. या दोघांचे लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले. मात्र आता अक्षयाचा एक खास फोटो समोर आला आहे.
हार्दिक आणि अक्षयाने पुण्यात सप्तपदी घेत नवीन आयुष्याला सुरुवात झाली. त्यांनी त्यांच्या या शाही विवाहसोहळ्यासाठी खास पारंपरिक लूक केला होता. तर पाठकबाईंनी हातामागावर विणलेली लाल रंगाची नऊवारी साडी नेसली होती. यावेळी नथ आणि पारंपरिक दागिन्यांमध्ये अक्षयाचं सौंदर्य अधिक खुलून दिसत होतं.
आणखी वाचा : Photos: मराठी कलाकारांच्या मंगळसूत्रांच्या हटके स्टाइल, डिझाईन पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
तर राणादानेही धोतर आणि कुर्ता परिधान केला होता. यामुळे तोही राजबिंडा दिसत होता. अक्षया-हार्दिकच्या लग्नातील मराठमोळ्या लूकची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. मात्र आता अक्षयाने तिच्या लग्नातील एक खास फोटो शेअर केला आहे. यावेळी तिने तिच्या लग्नातील लूकबद्दल पोस्ट शेअर केली आहे.
अक्षयाने परिधान केलेल्या या पारंपारिक लूकमध्ये तिने डोक्यावर घेतलेल्या ओढणीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. ही ओढणी नेटची आहे. यावर छान डिझाईन पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यावर सदा सौभाग्यवती भव:!! असेही लिहिण्यात आले आहे. यामुळे तिची ही ओढणी सध्या चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.
अक्षयाने तिच्या या ओढणीबरोबर काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोत ती कमालीची सुंदर दिसत आहे. तिच्या या पारंपारिक लूक पाहून अनेक चाहते तिच्या प्रेमात पडले आहे. या फोटोला कॅप्शन देताना ‘॥ सदा सौभाग्यवती भवः ॥’ असे तिने म्हटले आहे.
तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून अक्षया आणि हार्दिक घराघरात पोहोचले. या मालिकेतील त्यांच्या राणादा-पाठकबाईंच्या जोडीला प्रेक्षकांनीही भरभरुन प्रेम दिलं होतं. ऑनस्क्रीन चाहत्यांच्या मनात राज्य केलेली ही जोडी आता खऱ्या आयुष्यात विवाहबंधनात अडकली आहे. त्यामुळेत्यांचे चाहतेही खूश आहेत. अनेकांनी अक्षया-हार्दिकला सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्या आहेत.