‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेत शेवंताची भूमिका साकारत अपूर्वा नेमळेकरनं प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. झी वाहिनीवरील ‘आभास हा’ मालिकेतून तिनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि आता अपूर्वा पुन्हा एकदा ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसतेय. शेवंताप्रमाणेच सावनीचं पात्रही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात अपूर्वा नेमळेकरनं दोन पुरस्कार पटकावले. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील अपूर्वाच्या ‘सावनी’ भूमिकेला ‘सर्वोत्कृष्ट खलनायिका’ पुरस्कारानं गौरविण्यात आलं. तर ‘सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा’ हा विशेष पुरस्कारही तिला जाहीर झाला.

मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
archana patil have large amounts of gold
अर्चना पाटील सर्वाधिक सुवर्णसंपन्न महिला उमेदवार
Zee Natya Gaurav 2024 full list of winners
झी नाट्य गौरव २०२४ : प्रिया-उमेशच्या ‘जर तरची गोष्ट’ नाटकाने मारली बाजी, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

अपूर्वानं या सोहळ्याचे फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. दोन्ही ट्रॉफिज हातात घेऊन पोजसह घेतलेले फोटो तिनं शेअर केले आहेत. या सोहळ्यात अपूर्वानं काळ्या रंगाचा डिझायनर आऊटफिट परिधान केला होता. या पोस्टला अपूर्वानं कॅप्शन देत लिहिलं, “सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस आणि सर्वोत्कृष्ट खलनायिका हे दोन पुरस्कार दिल्याबद्दल मी खूप आभारी आहे. खलनायिकेच्या भूमिकेत असतानाही सर्वांत ग्लॅमरस चेहऱ्याचा पुरस्कार जिंकणं हे केवळ माझ्या अप्रतिम टीममुळेच शक्य झालं. माझी टीम मला दररोज सुंदर दिसण्यासाठी खूप मेहनत घेते.”

हेही वाचा… VIDEO: ‘हम दोनो है अलग अलग’; तितीक्षा तावडे आणि ऐश्वर्या नारकर यांचा भन्नाट डान्स

अपूर्वा पुढे म्हणाली, “सावनी प्रेक्षकांसमोर उत्तमरीत्या पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास आणि प्रेरणा माझी टीम मला देते. मी विशेषत: या वेळी स्वतःला आव्हान देण्यासाठी काहीतरी वेगळं करायचं म्हणून विरोधी भूमिका निवडली आणि मला खूप आनंद होतोय की हे आव्हान मी यशस्वीरीत्या पार पाडलं. कलाकार आणि क्रूच्या प्रत्येक सदस्याबरोबर काम करताना मला खूप मजा येते.” अपूर्वानं ‘प्रेमाची गोष्ट’च्या संपूर्म टीमचे आभार मानले आणि कृतज्ञता व्यक्त केली. अपूर्वाच्या चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट्स करीत तिचे मनापासून अभिनंदन केले.

हेही वाचा… “…सणसणीत कानाखाली मारलं आहे”; अजय पुरकर यांचं ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’ चित्रपटाबद्दल वक्तव्य, म्हणाले…

दरम्यान, अपूर्वाबद्दल सांगायचं झालं, तर नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध क्षेत्रांत अपूर्वानं अभिनय कौशल्य सादर केलं आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात अपूर्वानं स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता आणि या स्पर्धेत ती उपविजेती ठरली.