Bigg Boss Marathi 5 Nikki Tamboli : ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये ‘फॅमिली वीक स्पेशल’ टास्क चालू आहे. या आठवड्यात सर्व स्पर्धकांच्या घरातील सदस्य त्यांना भेटायला बिग बॉसच्या घरात येत आहेत. आजच्या एपिसोडमध्ये निक्कीच्या आईची घरात एंट्री होणार आहे. निक्की तांबोळी व तिच्या आईच्या भेटीचा प्रोमो कलर्सने शेअर केला आहे. यात निक्की तिचं आणि अरबाजचं नातं संपलं असं म्हणताना दिसत आहे.

निक्कीची आई प्रमिला तांबोळी म्हणाल्या की अरबाजचा साखरपुडा झाला आहे, जे त्याने केलं ते बरोबर नाही. यानंतर निक्की भडकते, अरबाज निक्कीचं जे होतं ते संपलं. ती त्याचे कपडे गोळा करते एका पिशवीत ठेवते आणि बिग बॉसला म्हणते की हे अरबाजचे कपडे आहेत, ते फेकून द्या. यानंतर खरंच अरबाजचा साखरपुडा झाला आहे का, अशा चर्चा होऊ लागल्या होत्या. यावर आता अरबाजने प्रतिक्रिया दिली आहे.

Bigg Boss Marathi: “सगळं संपलं,” अरबाजबद्दल आईने सांगितलं ते ऐकून भडकली निक्की, त्याचे कपडे फेकले अन्… पाहा VIDEO

अरबाज पटेलने दिलं स्पष्टीकरण

अरबाज पटेलने त्याच्या इन्स्टाग्रामवरील त्याच्या ब्रॉडकास्ट चॅनलवर एक ऑडिओ क्लिप शेअर करून या प्रोमोवर स्पष्टीकरण दिलं आहे. “मी आता कलर्स टीव्हीवर बिग बॉसचा प्रोमो पाहिला. बिग बॉसच्या घरात निक्कीच्या आई आल्या आहेत. त्या म्हणाल्या की लोक म्हणतायत की अरबाजचा साखरपुडा झाला आहे, पण तसंच काहीच नाही. माझा साखरपुडा झालेला नाही, लग्नही झालेलं नाही, या सगळ्या अफवा आहेत. या खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत, पण असं काहीच नाही. निक्कीला खरं काय ते माहीत नसल्याने ती रिअॅक्ट होणारच. त्यामुळे तुम्ही लोक टेन्शन घेऊ नका. जर माझी आणि निक्कीची भेट होईल, तर मी तिला सगळं सांगेन. जर तिने समजून घेतलं तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर हरकत नाही. पण या सगळ्या फक्त अफवा आहेत, माझा साखरपुडा झालेला नाही,” असं अरबाज पटेलने या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे.

अरबाज पटेलच्या मनात निक्कीसाठी भावना, त्याच्या गर्लफ्रेंडने घेतला मोठा निर्णय; म्हणाली, “आता स्वतःची…”

निक्कीच्या आईने काय म्हटलंय?

प्रोमोमध्ये प्रमिला तांबोळी निक्कीला म्हणतात, “अरबाज चुकीचा चाललाय, त्याने असं नव्हतं करायला पाहिजे, त्याची इंगेजमेंट झाली आहे.” यावर निक्की म्हणते, “कोणाची”? मग प्रमिला म्हणाल्या, “अरबाजची.” यानंतर निक्कीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. निक्की अरबाजचे कपडे आणि सगळं सामान गोळा करते आणि बिग बॉसला म्हणते की त्याचे सामान फेकून द्या.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अरबाजने बिग बॉसच्या घरात जाण्याआधी लीझा बिंद्रा ही त्याची गर्लफ्रेंड असल्याचं म्हटलं होतं. तसेच लवकरच दोघेही लग्न करतील, असंही म्हटलं होतं. पण बिग बॉसच्या घरात निक्की व अरबाज यांच्यात प्रेम फुलल्याचं पाहायला मिळालं. अरबाज गेला तेव्हा निक्की खूप रडली होती आणि त्याला संधी देण्याची विनवणी करत होती. अशातच आता निक्कीच्या आईने जे सांगितलं त्यानंतर अरबाज व निक्की यांच्या नात्याचं पुढे काय होणार ते निक्की शोमधून बाहेर आल्यावरच कळेल.