मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते हा सध्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या नव्या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. मराठीतील प्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक, निर्माता म्हणून त्याला ओळखले जाते. त्याने त्याच्या गाण्याने सिनेसृष्टीत एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. नुकतच अवधूतने सहलीचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केली आहे.

हेही वाचा- “जीवनदान दिल्याबद्दल आभार”, पुरामुळे मनालीत अडकलेला अभिनेता सुखरूप पडला बाहेर; म्हणाला, “या नदीमुळे…”

काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणले जाते. आयुष्यात एकदातरी काश्मीरला फिरायला जायची प्रत्येकाची इच्छा असते. अवधूत गुप्तेही नुकताच काश्मीरला फिरायला गेला होता. या सहलीचे फोटो अवधूतने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंना कॅप्शन देत अवधूतने क़मर सिद्दीक़ी यांचा प्रसिद्ध शेरही लिहिला आहे. या फोटोत अवधूत शिकरात बसलेला दिसून येत आहे. अवधूतच्या मागे डोंगर आणि झाडींचा मनमोहक दृष्य दिसत आहे.

काही महिन्यांपूर्वी अवधूतने राजकारणात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. मध्यंतरी अवधूत गुप्ते विविध राजकीय पक्षांच्या मंचावर झळकला होता. त्यामुळे तो लवकरच राजकारणात सक्रीय होऊ शकतो, याबद्दलच्या चर्चांना उधाण आले होते. अवधूत म्हणालेला, मला कोणतीही निवडणूक आली की विचारणा होतेच. त्यामुळे मी राजकारणात प्रवेश करणार आहे हे आता जाहीरच करुन टाकतो. जेव्हा काही मिळवायचं नाही किंवा काही गमवायचं नाही अशा वेळी मी राजकारणात येईन, असे स्पष्टीकरण अवधूतने दिले होते.