छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला ओळखले जाते. सध्या हा कार्यक्रम एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. या मालिकेत मिसेस रोशन सिंह सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवालने मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता याच मालिकेत ‘बावरी’ हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री मोनिका भदोरियानं शो चे निर्माते आणि कार्यकारी निर्मात्यांविरोधात आवाज उठवला आहे.

मोनिका भदोरियानं नुकतंच ‘हिंदुस्थान टाइम्स’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील सेटवर शूटींगदरम्यान कसं वातावरण असायचं याबद्दल सांगितले आहे. “मी २०१९ मध्येच हा शो सोडला होता. पण अद्याप निर्मात्यांनी मला माझं मानधन दिलेले नाही. त्यांनी माझे ४ ते ५ लाखांचे मानधन थकवले आहे. मी पैशांवरुन वर्षभर निर्मात्यांशी भांडले. त्यांनी आतापर्यंत मालिका सोडलेल्या अनेक कलाकारांचे पैसे थकवले आहेत. त्यांच्याकडे पैशांची अजिबात कमतरता नाही. पण केवळ त्रास देण्यासाठी पैसे थकवले जातात”, असे मोनिका भदोरिया म्हणाली.
आणखी वाचा : “माझ्या खोलीत ये आपण…” ‘तारक मेहता…’मधील प्रसिद्ध अभिनेत्रीचा निर्मात्यांवर गंभीर आरोप, धक्कादायक खुलासा करत म्हणाली “मी गरोदर असताना…”

त्यापुढे ती म्हणाली, “‘तारक मेहता’च्या सेटवर माझे आयुष्य ‘नरका’सारखे झाले होते. त्यावेळी माझी आई कॅन्सरवर उपचार घेत होती. पण यावेळीही शो च्या निर्मात्यांनी मला सहाय्य केलं नाही. मी पूर्ण रात्र रुग्णालयात थांबायचे आणि ते सकाळी मला लवकर सेटवर बोलवायचे. मी त्यावेळी येऊ शकत नाही, असे त्यांना सांगायचे. पण तरीही ते मला बोलावयाचे. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे शूटिंगला आल्यानंतर मला थांबावे लागायचे. माझं काही काम नसतानाही मला लवकर बोलवलं जायचं.”

“जेव्हा माझ्या आईचे निधन झाले तेव्हा निर्माता असित मोदी यांनी मला एकही फोन केला नाही. आईच्या निधनामुळे मला धक्का बसला होता, पण माझ्या आईच्या मृत्यूनंतर अवघ्या सात दिवसांनी त्यांनी मला फोन केला आणि सेटवर येण्यास सांगितले. त्यावेळी मी त्यांना माझी तब्येत बरी नाही, असे सांगितले तेव्हा त्यांची टीम म्हणाली, ‘आम्ही तुम्हाला पैसे देत आहोत, आम्हाला पाहिजे तेव्हा तुम्हाला हजर राहावे लागेल. तुमची आई अ‍ॅडमिट असो वा अन्य कुणी. माझ्याकडे पर्याय नव्हता म्हणून मी सेटवर गेले आणि मी तिथे रोज रडायचे. त्याबरोबरच ते त्रास आणि गैरवर्तन करायचे. कॉल टाईमच्या एक तास आधी ते मला कॉल करायचे. त्यांच्या सेटवर खूप गुंडगिरी आहे. असित मोदी म्हणतात की मी देव आहे. हे ऐकल्यानंतर मी त्यांना काम करायचे नाही, असे सांगितले. सोहेल रमानी हा तर सगळ्यात उद्धट बोलणारा माणूस आहे.” असेही ती म्हणाली.

आणखी वाचा : “एकनाथ शिंदे साहेब मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, पण…” मराठी अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली “चार हात, दोन फोन, एक नाथ…”

“‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत सध्या काम करणारे कलाकार त्यांच्याविरोधात एक शब्दही बोलणार नाहीत. कारण असित मोदीने त्यांच्याकडून एक करार सही करुन घेतला आहे. यामुळे ते असित मोदीच्या विरोधात मीडियामध्ये काहीही चुकीचे बोलू शकत नाहीत. जेव्हा इतरांनी शो सोडला, तेव्हा जेनिफर मिस्त्रीही काहीही बोलली नव्हती. जेव्हा तिच्याबरोबर या गोष्टी झाल्या, तेव्हा ती याबद्दल बोलली. प्रत्येकाला आपली नोकरी वाचवायची आहे. त्याने जितका त्रास दिला आहे, तितका त्रास अद्याप कोणीही दिलेला नाही.” असेही तिने म्हटले.

मोनिका पुढे म्हणाली, “ते पैशाच्या बाबतीत नेहमीच फसवेगिरी करायचे. खरं सांगायचं तर ते कलाकारांना कुत्र्यासारखं वागवायचे. त्याने मला खूप वाईट वागणूक दिली आहे आणि त्यांचा कार्यकारी निर्माता सोहेल रमानी सगळ्यात वाईट माणूस आहे. तो खूप उद्धट आहे. त्याने नट्टू काकांनाही शिवीगाळ केली होती. मी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका जेव्हा केली तेव्हा मला दर महिन्याला ३० हजार मिळत होते. त्यांनी मला ६ महिन्यांनी पगार वाढवणार असल्याचे सांगितले. पण त्यांनी पैसे वाढवलेच नाही.”

आणखी वाचा : “काही दिवसांनी असे लोक रस्त्यावर सेक्स करतील”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या पोस्टवर नेटकऱ्याची कमेंट, उत्तर देत म्हणाली “स्त्रियांबद्दल…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोनिका भदोरिया व्यतिरिक्त ‘तारक मेहता’चे माजी दिग्दर्शक मालव रझदा यांनीही जेनिफर मिस्त्री बन्सीवालला पाठिंबा दिला आहे. जेनिफर मिस्त्रीने अलीकडेच सोहेल रमानी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्यावरिधोता गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिने असित मोदींवरही गंभीर आरोपही केले आहेत.