Premium

Bigg Boss 17: मन्नारा चोप्राने अंकिता लोखंडेच्या तोंडावर फेकली कॉफी; नॉमिनेशनदरम्यान झाला हंगामा, पाहा नवा प्रोमो

Bigg Boss 17 Update: बिग बॉसमध्ये ‘या’ आठवड्यात कोण-कोण नॉमिनेट झालंय? जाणून घ्या…

Bigg Boss 17 Update mannara chopra nominate ankita lokhande
Bigg Boss 17 Update: बिग बॉसमध्ये 'या' आठवड्यात कोण-कोण नॉमिनेट झालंय? जाणून घ्या…

‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाची दिवसेंदिवस लोकप्रियता अधिकाधिक वाढत चालली आहे. बिग बॉस हे नवं पर्व प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरलं आहे. त्यामुळे टेलीव्हिजनवरील हा वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो टीआरपीमध्येही अव्वल स्थानावर आहे. गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे तेहेलका भाई उर्फ सनी आर्य याला शोमधून काढण्यात आलं. नुकताच बिग बॉसचा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रिया थोड्या वेगळ्या अंदाजात आहे. तोंडावर कॉफी फेकून स्पर्धकांना इतर स्पर्धकाला नॉमिनेट करायचं आहे. प्रोमोमध्ये, मुनव्वर फारूकी ऐश्वर्याला नॉमिनेट करताना दिसत आहे. तो म्हणतो, “इतर स्पर्धकांच्या तुलनेत खेळात तुझा (ऐश्वर्या) सहभाग दिसत नाही.” तर नील अनुरागवर कॉफी फेकून त्याला नॉमिनेट करताना दिसत आहे.

हेही वाचा – प्रसिद्ध रॅपर बादशाह पाकिस्तानी अभिनेत्रीला करतोय डेट? फोटो झाले व्हायरल

तसेच अंकिता लोखंडे मन्नारा चोप्रावर कॉफी फेकून नॉमिनेट करते आणि मन्नारा अंकिताच्या तोंडावर कॉफी फेकून तिला नॉमिनेट करताना पाहायला मिळत आहे. अंकिता मन्नारा म्हणते की, “तुला मी आवडत नाही आणि मला तू आवडत नाहीस. तर मी हे शत्रूत्व कायम ठेवू इच्छिते.” तर मन्नारा अंकिताला नॉमिनेट करताना म्हणते की, “ही ज्यांच्याबरोबर आहे, त्यांच्याबरोबरच ती नाहीये. तर आता तुम्ही सगळ्यांनी ठरवा.”

हेही वाचा –“सनातन हिंदू धर्म संपवण्याचे भाष्य करणार्‍या…”, तीन राज्यातील भाजपाच्या विजयानंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट

याशिवाय अभिषेक सनाला नॉमिनेट करतो. तर ऐश्वर्या, अरुण अभिषेकला नॉमिनेट करतात. यावेळी अरुण आणि अभिषेकमध्ये वाद होतात. आता अखेर कोण-कोण या आठवड्यात नॉमिनेट होतंय? हे येत्या काळात समजेल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bigg boss 17 update mannara chopra nominate ankita lokhande pps

First published on: 04-12-2023 at 18:57 IST
Next Story
“ताई तू आहेस, पण माझी दादागिरी…”, प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने बहिणीला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, पोस्ट चर्चेत