छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठी हा कार्यक्रम कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या कार्यक्रमाचे चौथे पर्व पार पडले. अक्षय केळकर हा बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. बिग बॉस या कार्यक्रमामुळे अनेक कलाकार कायमच प्रसिद्धीझोतात येत असतात. त्यातीलच एका अभिनेत्याने फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे तो चर्चेत आला आहे.

बिग बॉस मराठी फेम अभिनेता म्हणून पराग कान्हेरेला ओळखले जाते. पराग हा ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला. तो एक प्रसिद्ध शेफ आहे. परागने नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तो प्रचंड वैतागलेला असल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “लोकांनी कितीही टीका केली तरी…”, ‘बिग बॉस’ फेम पराग कान्हेरेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
artificial intelligence generating revolution in film industry
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेने चित्रपटांना संजीवनी

पराग कान्हेरेची पोस्ट

“Happy new year 2023…
One announcement
द्वेष करणारे तुमचे अपयश प्रसारित करतील परंतु तुमचे यश कुजबुजतील.. gossip and grudges
मी माझ्या शेवटच्या 3 व्यवसायांमध्ये अयशस्वी झालो,यशस्वी सेलिब्रिटी म्हणून सिद्ध करण्यात अपयशी ठरलो
कोणतेही टेलिव्हिजन शो नाहीत, नवीन संधी नाहीत आणि त्याही वर..
द्वेष करणारे माझ्या पाठीवर गलिच्छ बोलत राहिले.
काल मला एक गोष्ट जाणवली की जे माझ्याबद्दल नकारात्मक बोलतात, माझ्या अपयशावर चर्चा करतात, त्यांनी माझ्याशी कधीच व्यवहार केला नाही.. त्यांनी फक्त दुसर्‍याकडून ऐकले आहे.. पण या “गॉसिप” नी खरं तर माझं आयुष्य दयनीय बनवलं आहे.
महामारीची परिस्थिती, व्यवसाय प्रकल्पातील अपयश, एखाद्याला वाईट व्यक्ती किंवा गुन्हेगार बनवत नाही… unfortunately मला गुन्हेगार म्हटले गेले. पण तुम्ही सर्व जे खरेच माझे हितचिंतक आहात…. फक्त थांबा आणि पहा
या फेब्रुवारीमध्ये मी माझा चौथा विश्वविक्रम करणार आहे..
द्वेष करणाऱ्यांचे तोंड बांबूने बंद केले जाईल..
पराग कान्हेरे काय आहे हे पुढील 3 महिन्यांत सिद्ध होईल
आर या पार, बास म्हणजे बास आता”, असे पराग कान्हेरेने म्हटले आहे.

आणखी वाचा : “आजपासून शपथ घेतो की मी कधीही ब्राह्मण…” जातीयवादाच्या मुद्द्यावर मराठी अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान पराग कान्हेरेच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “हे लोक कोण आहेत माहीत नाही.. पण नवीन प्रकल्पासाठी खूप खूप शुभेच्छा.. मला वाटतं तुमच्या पोस्टपेक्षा काम बोलेल.. जे तुमच्याबाबत निगेटिव्ह बोलतात, त्यांच्याविषयी पुन्हा आपणही negative post टाकू नये.. पण एक आहे यातून भूक समजते.. होईल सगळं छान.. बेस्ट ऑफ लक..”, अशी कमेंट एकाने केली आहे.