Yogita Chavan dance Video: पडद्यावर दिसणारे अनेक कलाकार सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या संपर्कात असतात. फोटो, व्हिडीओ, सोशल मीडिया, डान्स, विनोद अशा अनेक माध्यमांतून कलाकार दिसत असतात. या माध्यमातून कलाकारांची माहीत नसलेली बाजू प्रेक्षकांसमोर येते.
‘जीव माझा गुंतला’ फेम अभिनेत्री योगिता चव्हाण जितकी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते, तितकीच तिच्या डान्ससाठीदेखील ओळखली जाते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती विविध व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांच्या संपर्कात राहते. आता अभिनेत्रीने शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स
योगिता चव्हाणने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये योगिता ‘ये मेरा दिल प्यार का दीवाना’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. योगिताच्या डान्स स्टेप्स आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. तिच्याबरोबर आणखी एक मुलगी या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या दोघींचा डान्स चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
योगिताच्या डान्सवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनीदेखील कमेंट्स करत योगिताचे कौतुक केले आहे. ‘लक्ष्मी निवास’फेम अभिनेत्री अमृता देशमुखने योगिताच्या व्हिडीओवर ‘हॉट’ अशी कमेंट केली आहे. धनंजय पोवारने ‘कमाल’ अशी कमेंट करत कौतुक केले आहे. कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकरनेदेखील इमोजी शेअर करत योगिताचे कौतुक केले आहे. किशोरी अंबिये यांनीदेखील इमोजी शेअर केल्या आहेत.




कलाकारांबरोबरच चाहत्यांनीदेखील योगिताचे कौतुक केले आहे. “एक नंबर, ताई मी तुमचा फॅन आहे”, “बिग बॉसमध्ये तुमचा साधेपणा भावला, तिथे तुम्ही खऱ्या वाटल्या, त्यामुळे मी तुमचा चाहता झालो. आता तुमचे डान्सचे व्हिडीओ पाहतो, तेदेखील खूप छान असतात”, “जमतंय की, वाह! वा मस्त”, “ताई तुला कोरिओग्राफरची गरज नाही”, “किती प्रेमात पाडशील”, “सौरभबरोबर डान्स रील बघायची आहे. आम्हाला आमच्या अंतरा मल्हारची आठवण येतेय”, “खूप सुंदर”, “तुझे हावभाव आणि डान्स स्टेप्स खूप छान आहेत”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.



योगिताच्या कामाबद्दल बोलायचे तर जीव माझा गुंतला या मालिकेतून लोकप्रिय झाली. त्यानंतर ती बिग बॉस मराठी ५मध्येदेखील दिसली होती.