अजय देवगण- तब्बूच्या ‘भोला’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे मात्र त्याआधी मागच्या वर्षी आलेल्या दृश्यम २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. ‘दृश्यम’च्या पहिल्या भागापासूनच प्रेक्षक उत्सुक होते, शिवाय मल्याळमध्ये याचा पुढचा भाग आल्यावर तर ती उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली. यामुळेच या चित्रपटाच्या रिमेकलाही उत्तम प्रतिसाद मिळाला. ‘दृश्यम २’ ओटीटीवरही धुमाकूळ घालत आहे. आता हाच चित्रपट छोट्या पाड्यावर अर्थात टीव्हीवर प्रक्षेपित केला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रेक्षकांना अगदी शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा हा चित्रपट येत्या २५ मार्च रोजी रात्री ८ वाजता कलर्स सिनेप्लेक्स या वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. कलर्स सिनेप्लेक्स वाहिनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटनवरून पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. हा चित्रपट ‘दृश्यम’ या २०१५ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा सिक्वेल आहे.

…अन् शाहरुखच्या ‘या’ चित्रपटात राणी मुखर्जीने ऐश्वर्याला केलं रिप्लेस; सेटवर नेमकं काय घडलं होतं

‘दृश्यम २’ हा चित्रपट १८ नोव्हेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने अनेक आठवडे बॉक्स ऑफिसव ठाण मांडले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल २३९ कोटीहून अधिक कमाई केली. यात अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन, अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच या चित्रपटात मराठमोळे कलाकार दिसले होते, नेहा जोशी, सिद्धार्थ बोडके या कलाकारांच्या भूमिका लक्षात राहिल्या आहेत.

दरम्यान अजय तब्बू पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांचा आगामी ‘भोला’ हा चित्रपट येत्या ३० मार्चला ‘भोला’ बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood blockbuster film drishyam 2 television premiere on 25th march spg
First published on: 21-03-2023 at 12:40 IST