बॉलिवूडमधील राणी मुखर्जी एक गुणी अभिनेत्री आहे. नुकताच तिचा ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘राजा की आयेगी बारात’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. करण जोहरच्या ‘कुछ कुछ होता हैं’ चित्रपटाने तिला वेगळी ओळख मिळाली. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर ती झळकली होती. मात्र शाहरुखच्याच एका चित्रपटात तिची अचानक एंट्री झाली.
बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुखबरोबर रोमान्स करण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री उत्सुक असतात. मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी अभिनेत्रीन ऐश्वर्या रायनेदेखील किंग खानबरोबर काम केलं आहे. शाहरुखच्या ‘चलते चलते’ या चित्रपटात ऐश्वर्या राय त्याच्याबरोबर काम करत होती. चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले होते. चित्रपटाच्या सेटवर तेव्हा सलमान खान
“त्यांना काम आवडले पण…” वेबसीरिजसाठी नकार मिळाल्याने सुप्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत
राणी मुखर्जीने आपल्यासशक्त अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. मात्र करियरच्या सुरवातीला तिला तिच्या आवाजामुळे त्रास सहन करावा लागला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने गुलाम चित्रपटाच्यावेळी घडलेल्या प्रसंगाबद्दल सांगितले आहे. ती असं म्हणाली, “जेव्हा तुम्ही नवे असता तेव्हा चित्रपटांच्याबाबतीत तुमच्याकडे पर्याय नसतो. चित्रपट उत्तम व्हावा यासाठी निर्माते निर्णय घेत असतात. फक्त ‘गुलाम’ या चित्रपटासाठी माझा आवाज डब करण्यात आला होता.”
दरम्यान, ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट १७ मार्च २०२३ रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात राणी मुखर्जीबरोबर अनिर्बन भट्टाचार्य, जिम सरभ आणि नीना गुप्ता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिमा छिब्बर यांनी केले आहे.
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.