छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘चला हवा येऊ द्या’ ला ओळखले जाते. या विनोदी मालिकेतून अनेक कलाकार घराघरात पोहोचले. याच कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून अंकुर वाढवेला ओळखले जाते. आता अंकुश वाढवेने एका नव्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. अभिनेता कुशल बद्रिकेने त्याला यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कुशल बद्रिकेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अंकुर वाढवे आणि इतर काही कलाकार पाहायला मिळत आहे. अंकुर वाढवे लवकरच एका नव्या नाटकात झळकणार आहे. ‘व्यक्ती प्रवृत्ती’ असे या नाटकाचे नाव आहे.
आणखी वाचा : विराजस कुलकर्णी-शिवानीची रोमँटिक ट्रीप, मालदीवमध्ये राहत असलेल्या व्हिलाचे एका दिवसाचे भाडे किती?
या नाटकाचे लेखन अंकुर वाढवे आणि विजय राख यांनी केले आहे. तर अंकुर वाढवे या नाटकाचे दिग्दर्शन करत आहे. या नाटकाच्या निमित्ताने अंकुरने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. या निमित्ताने कुशलने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
“अंकुर मित्रा एक माणूस म्हणून तू जेवढा प्रामाणिक आहेस , तेवढाच एक अभिनेता म्हणून प्रामाणिक आहेस . अभ्यासू आणि समाजाचं कायम भान ठेऊन जगणारा आहेस . तुझ्या सारख्या माणसाने दिग्दर्शन क्षेत्रात यायला हवंच होतं. तू जे काही करतोस ते तुझे १०० टक्के देऊन करतोस . तुझ्या ह्या पदार्पणास माझ्या मना पासून शुभेच्छा मित्रा”, अशी पोस्ट कुशलने केली आहे.
आणखी वाचा : गोपीनाथ मुंडेंचे निधन ते प्रीतम मुंडेंची खासदारकी, पंकजा मुंडेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग
कुशलने केलेल्या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या पोस्टवर अंकुरनेही कुशलचे आभार मानले आहेत. ‘धन्यवाद दादा’, अशी कमेंट अंकुरने केली आहे.