झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो. या कार्यक्रमामध्ये काम करणाऱ्या कलाकारांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अंकुर वाढवे. अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर अंकुरने सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतंच त्याने त्याच्या पत्नीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

अंकुर वाढवे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने त्याच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या पत्नीबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : “जायचं तर जा, आम्हाला…” अमेरिकेला निघालेल्या पत्नीसाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट, म्हणाला “तू परत येशील तेव्हा…”

अंकुर वाढवेची पोस्ट

“लेट पोस्ट
प्रिय बायको,
“व्यास्तातला व्यस्त ‘ वेळ ‘ तुझ्यासाठी
झोपेची अर्धी झोप तुझ्यासाठी
ओलांडली सीमा प्रेमाची तुझ्यासाठी
माझा कण नी कण तुझ्यासाठी
माझं मीपण तुझ्यासाठी
आयुष काय आहे? त्यापेक्षा जे महत्वाचं ते तुझ्यासाठी.”
सतत कामात काम हेच परम धेय्य या वृत्तीचा मी आहे. लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून ते महत्वाच्या अनेक प्रसंगी तुला सोडून कामाला महत्व दिले आहे त्याला तू तेवढंच समजून घेतलं. काल तुझा वाढदिवस schedule कॅन्सल झाल्याचा आनंद फक्त मला माहित आहे. म्हणूनच तुला सरप्राइज देण्यासाठी कोणाला काहीही न सांगता घरी आलो. तुला कुठेही फिरवू शकलो नाही पण काल आपण night out पुसद मध्ये मध्य रात्री घालवली (तुला आवडलं की नाही माहीत नाही पण मी ह्या कॉलेज मध्ये शिकलो! मी इथून पैदल steno च्या class ला जयायचो म्हणून) तुला बोर केलं, असो तुला happy birthday darling,” असे अंकुर वाढवेने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : Video : “४५ हून अधिक वर्ष लोटली तरी…” नाना पाटेकरांनी केला मैत्रिणींचा खास पाहुणचार

आणखी वाचा : “तुम्ही सॉफ्टवेअर उद्योजक आणि ती…” पतीबरोबर फ्लाईटमध्ये घडलेल्या ‘त्या’ घटनेवर सुधा मूर्तींनी केलेले भाष्य, म्हणाल्या “सिनेसृष्टीतील कलाकारांचे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अंकुर वाढवेच्या या पोस्टवर अनेक कलाकार तसेच त्याचे चाहते कमेंट करताना दिसत आहेत. त्याच्या अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा वहिनीसाहेब’, अशी कमेंट त्यांनी केली आहे.