मालिकाविश्वातून एक धक्कादायक बातमी आली आहे. टीव्ही मालिका ‘धरतीपुत्र नंदिनी’मध्ये मुख्य भूमिका साकारणारा टीव्ही अभिनेता अमन जैस्वाल याचे निधन झाले आहे. रस्ते अपघातात अमनचा मृत्यू झाला. अमन अवघ्या २३ वर्षांचा होता.

‘धरतीपुत्र नंदिनी’ या मालिकेचे लेखक धीरज मिश्रा यांनी इंडिया टुडेला यासंदर्भात माहिती दिली आहे. “अमन एका ऑडिशनसाठी जात होता. जोगेश्वरी महामार्गावर त्याच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली,” असं धीरज यांनी सांगितलं.

हेही वाचा – “किती वेळ लागेल” जखमी सैफ अली खानने रिक्षा चालकाला विचारलेला प्रश्न; म्हणाला, “खूप रक्तस्त्राव…”

अमन जैस्वाल हा मूळचा उत्तर प्रदेशमधील बलिया येथील होता. ‘धरतीपुत्र नंदिनी’मध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती. सोनी टीव्हीवरील ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या शोमध्ये त्याने यशवंत राव फणसे यांची भूमिका साकारली होती.

हेही वाचा- ढसाढसा रडत निक्की तांबोळी म्हणाली, “मी खूश नाही”; अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनाही अश्रू अनावर, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मॉडेलिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या अमनने ‘उडारियां’ मालिकेतही काम केलं होतं.