गेल्या अनेक दिवसांपासून सिनेसृष्टीतून अनेक धक्कादायक बातम्या समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी एका प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचे समोर आलं होतं. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. त्यानंतर आता सिनेसृष्टीतून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नुकतंच एका प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शकाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलले आहे. त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.

प्रसिद्ध तामिळ अभिनेता-दिग्दर्शक लोकेश राजेंद्रनने आत्महत्या केली आहे. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी त्याने टोकाचे पाऊल उचललल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. लोकेशने मर्मदेशम या मालिकेतून बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. एक उत्तम अभिनेता-दिग्दर्शक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. या वृत्तामुळे सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
आणखी वाचा : आलिया भट्टच्या चेहऱ्यावर दिसला प्रेग्नन्सी ग्लो, डोहाळे जेवणाचे फोटो समोर

लोकेश यांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकेश राजेंद्रन आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. त्याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्याला दोन मुले आहेत. गेल्या महिन्यात लोकेश आणि त्याच्या पत्नीमध्ये कोणत्यातरी गोष्टीवरुन खटके उडण्यास सुरुवात झाली होती. गेल्या आठवड्यात त्याला त्याच्या पत्नीने घटस्फोटाची कायदेशीर नोटीसही पाठवली होती. यामुळे तो प्रचंड तणावाखाली होता. मी शुक्रवारी ३१ सप्टेंबरला त्याच्याकडे गेलो होतो. त्यावेळी त्याला शेवटचं पाहिलं होतं असे त्याच्या वडिलांनी सांगितले. त्यावेळी त्याने मला पैशांची गरज आहे, असे सांगितले. मी त्याला ते देऊ केले. लोकेशला एडिटिंग क्षेत्रात काम करायचे होते.

लोकेशने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. जवळपास १५० हून अधिक मालिकेत त्याने विविध भूमिका साकारल्या आहेत. त्याने विजयकांत, प्रभू यांसह अनेक कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. तसेच १५ चित्रपटातही त्याने काम केले आहे.

आणखी वाचा : “मुलुख माझा, हुकूम माझा मग भाषा पण माझीच…” राज ठाकरेंचा दमदार आवाज असलेल्या चित्रपटाचा टीझर पाहिलात का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकेशला त्याच्या कौटुंबिक समस्यांमुळे दारुचे व्यस्न लागले होते. तो अनेकदा चेन्नई मुफस्सिल बस टर्मिनस (सीएमबीटी) या ठिकाणी झोपलेला असायचा. सोमवारी ३ ऑक्टोबरला बस टर्मिनसवर तो झोपलेला होता. त्यावेळी त्याची तब्येत ठिक नाही, असे काही प्रवाशांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी रुग्णवाहिकेला फोन केला आणि पोलिसांनाही त्याची माहिती दिली. त्यानंतर त्याला किलपॉक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र मंगळवारी ४ ऑक्टोबरला त्यांची प्राणज्योत मालवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी पोलिसांनी सीआरपी कलम १७४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिस याबद्दलचा अधिक तपास करत आहेत. तसेच त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबद्दलही अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही