मराठी कलाविश्वातील अनेक नावाजलेल्या विनोदवीरांपैकी एक विनोदवीर म्हणजे भाऊ कदम म्हणजेच भालचंद्र. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे तर आज प्रत्येक घराघरात भाऊ कदमचं नाव पोहोचलं आहे. भाऊने आजवर उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तो इथवरच थांबला नाही तर त्याने आता स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू केलं आहे. त्याचबरोबरीने भाऊची लेक मृण्मयी कदमही स्वतःचा व्यवसाय करत आहे.
आणखी वाचा – “फक्त बघून मोकळं व्हायचं” ‘तो’ व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्याची तक्रार, समीर चौघुलेंनी चक्क माफी मागितली अन्…
मृण्मयीने के. जी. जोशी आणि एन. जी. बेडेकर कॉलेज ऑफ कॉमर्समधून शिक्षण पूर्ण केलं. तिचं स्वतःचं स्वत:चं युट्युब चॅनलही आहे. २०२०मध्ये तिने ‘तारुंध्या’ हा ब्रँड सुरू केला. मृण्मयीचा ‘ट्रेंडी हेअर बो’ (Scrunchies)चा व्यवसाय आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मृण्मयीने तिच्या या व्यवसायाबाबतच एक व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.
स्वतःचा खर्च भागवण्यासाठी वयाच्या १८व्या वर्षी मृण्मयीने हा व्यवसाय सुरू केला. यादरम्यान तिच्या पाठिशी तिचं संपूर्ण कुटुंब उभं राहिलं. सुरुवातीच्या काळात व्यवसायामध्ये मृण्मयीला नुकसानही सहन करावं लागलं. पण भाऊ व त्यांची पत्नी मृण्मयीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. मृण्मयी म्हणते, “वडिलांनी माझ्या व्यवसायामध्ये गुंतवणूक केली. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल ममता कदम धन्यवाद. जेव्हा कधी मी ‘शार्क टँक’ कार्यक्रमामध्ये जाईन तेव्हा आपण दोघी एकत्र जाऊ.”
आणखी वाचा – …तरच करीना कपूर खानचा लेक रात्रीचं जेवण जेवतो, २ वर्षांच्या जेहबाबत अभिनेत्रीचं भाष्य, म्हणाली…
“आईशिवाय ‘तारुंध्या’ काहीच नाही. माझ्या काकांनी मला पावलोपावली मार्गदर्शन केलं. ते माझ्या अगदी जवळचे मित्र आहेत. तसेच माझ्या भावंडांचाही यामध्ये मोठा वाटा आहे”. मृण्मयीचा व्यवसाय आता बऱ्यापैकी स्थिरावला आहे. इतकंच नव्हे तर भाऊच्या पत्नीने लेकीच्या या ब्रँडसाठी खास फोटोशूटही केलं आहे. हा व्यवसाय आणखी वाढला पाहिजे यासाठी मृण्मयी प्रयत्न करत आहे.