‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अल्पावधीत ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली असून मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याच मालिकेतील विजय भोसले म्हणजेच अभिनेता हरीश दुधाडेचं सरकार दरबारी कौतुक झालं आहे.

अभिनेता हरीश दुधाडेने सोशल मीडियावर हा अविस्मरणीय दिवसाचा अनुभव शेअर केला आहे. हरीशने राज्यपाल रमेश बैस यांच्याबरोबरचे फोटो शेअर करत लिहिलं आहे, “एक कलाकार म्हणून आम्हाला विविध प्रकारे कामाची पावती मिळत असते, पण सरकार दरबारी जेव्हा ती नोंद घेतली जाते तेव्हा तो दिवस अविस्मरणीय ठरतो. माननीय गव्हर्नर ‘श्री . रमेशजी बैस’ यांच्या निवासस्थानी आज मला आमंत्रित केले गेले. आजवर केलेल्या अनेक भूमिकांपैकी ‘विजय भोसले’ ही भूमिका याचे मुख्य कारण ठरली. आपलं काम कोण कधी कुठे पाहत असतं काही सांगता येत नाही. या गोष्टीवर आज खऱ्या अर्थाने विश्वास बसला. माझ्या कामाचं कौतूक केलं सन्मान केला. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद असेच कायम राहू द्या.”

हेही वाचा – Shehnaaz Gill Birthday: अभिनयासाठी घर सोडलं, पंजाब ते बॉलीवूडपर्यंत ‘असा’ होता शहनाझ गिलचा प्रवास

हरीशच्या या पोस्टवर कलाकार मंडळीसह त्यांच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “बहिर्जी अभिमान वाटतो”, “मनापासून केलेल्या कामाची पावती कोणाकडून, कधी, कुठे मिळेल…काही सांगता येत नाही…”, “खरंच तुम्ही विजय भोसलेचं काम खूप छान करता”, अशा अनेक प्रतिक्रिया अभिनेत्याच्या पोस्टवर चाहत्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील मल्हार नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस, पाहा प्रोमो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हरीशच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने काही मालिकांसह चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘फतेशिकस्त’, ‘फर्जंद’, ‘पावनखिंड’ या चित्रपटातील त्यांच्या कामाचं खूप कौतुक झालं होतं.