Actress Neha Laxmi New Home Photos: ‘इश्कबाज’ फेम अभिनेत्री नेहा लक्ष्मीने मुंबईत हक्काचं घर घेतलं आहे. नुकताच तिने नवीन घरात गृहप्रवेश केला. तिने नव्या घरातील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिच्या घराची झलकही पाहायला मिळतेय.
नेहाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिच्या नवीन घराची झलक दाखवली आहे. तिने वास्तु शांती पूजेचे फोटो शेअर केले आहेत. त्याचबरोबर एक मोठी पोस्ट देखील लिहिली आहे. हा दिवस तिच्यासाठी खूप महत्वाचा आहे असंही तिने सांगितलं. तिच्या या पोस्टवर इंडस्ट्रीतील तिच्या मित्र-मैत्रिणींनी कमेंट्स केल्या आहेत. तसेच चाहत्यांनीही नेहाचं अभिनंदन केलं आहे.
नेहाने कॅप्शनमध्ये लिहिलं, “नवीन सुरुवात. पवित्र विधी. कृतज्ञता. आम्ही इतक्या दिवसांपासून जे स्वप्नं पाहिलं होतं ते पूर्ण झालं. आम्ही नवीन घरात पाऊल ठेवलं. आम्ही खूप आनंदी आहोत, हात जोडून प्रार्थना करत आम्ही वास्तुशांती पूजा केली. या पवित्र जागेच्या प्रत्येक कोपऱ्यात देवाचे आशीर्वाद असावे, शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळावी यासाठी आम्ही वास्तुशांती पूजा केली.”
नेहाने तिच्या लग्नातील हिरव्या रंगाची सुंदर कांजीवरम साडी या पूजेसाठी नेसली. तसेच तिने टेम्पल ज्वेलरी व पारंपरिक महाराष्ट्रीय नथीने तिचा लूक पूर्ण केला. “हे फक्त एक घर नाही – हे आमच्या नव्या आयुष्याची सुरुवात आहे. हे घर आम्ही प्रेम, परंपरा आणि स्वप्नांनी बांधलं आहे. इथे हास्य, सकारात्मक ऊर्जा आणि चांगल्या आठवणींनी भरलेलं आयुष्य जगायचं आहे,” असं नेहाने म्हटलं.
पाहा पोस्ट-
३३ वर्षीय नेहा लक्ष्मी हिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘क्रिष्णाबेन खाखरावाळा’, ‘दिल बोले ओबेरॉय’, ‘कबूल है’, ‘इश्कबाज, ना आना इस देस लाडो, ससुराल सिमर का या मालिकांमध्ये नेहाने विविध भूमिका साकारल्या आहेत.
नेहाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास तिने वर्षभरापूर्वी लग्न केलं. तिच्या पतीचं नाव रुद्रांश जोशी असं आहे. रुद्रांश मराठी असून नेहा दाक्षिणात्य कुटुंबातील आहे. दोघांनी पारंपरिक मराठी व दाक्षिणात्य पद्धतीने लग्नगाठ बांधली होती.