अभिनेता जय भानुशाली आणि अभिनेत्री माही विज यांची मुलगी तारा सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. जय व माही त्यांची मुलगी ताराच्या नावाचे इन्स्टाग्राम पेज सांभाळतात. या पेजवर ते ताराचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. पण नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओत ताराला नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केलं. त्यानंतर माही विजने लेकीला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

गरोदरपणात स्वप्न केलं पूर्ण; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने ‘या’ ठिकाणी घेतलं घर, पाहा व्हिडीओ

‘तारा जय माही’ या पेजवरून चिमुरड्या ताराचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत ती नमाज पठण करताना दिसत आहे. पण हा व्हिडीओ नेटकऱ्यांना फार आवडला नसल्याचं दिसतंय. “शुक्रन” असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.

पण तिच्या या नमाज पठणाच्या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. “तुमच्या नाटकाचा भाग मुलीला करू नका. हिंदू असून अशा गोष्टी करताय, लाज बाळगा,” अशी कमेंट एका युजरने केली होती.

tara bhanushali trolling
ताराच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

“आजपर्यंत मला ताराचे व्हिडीओ आवडायचे, पण हे खरंच निराशाजनक आहे. तुम्ही हिंदू असून तुमच्या मुलीला असं शिकवत आहात,” असं एका नेटकऱ्याने म्हटलंय.

tara bhanushali trolling
ताराच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

“तुमची मुलगी कधीच पूजा करताना दिसत नाही. सर्व धर्माचा आदर करा, पण ज्या धर्मात जन्म झाला आहे, त्या धर्माप्रमाणे जगा. मुस्लीम धर्म इतकाच आवडत असेल तर तो स्वीकारा,” अशी कमेंट एका युजरने केली आहे.

tara bhanushali trolling
ताराच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

या व्हिडीओमुळे ताराला प्रचंड ट्रोल केलं गेलं, त्यानंतर माही विजने मुलीचा आणखी एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये ती माहीसोबत मंदिरात दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, “हे त्या बकवास लोकांसाठी, ज्यांनी धर्माला चेष्टा बनवून टाकलंय. तुम्ही ताराला अनफॉलो करू शकता, तिला द्वेष पसरवणाऱ्यांची गरज नाही. एक आई म्हणून मी तिला गूडलक शिकवत आहे, त्यामुळे संकुचित विचारांच्या लोकांनो आयुष्यात काहीतरी काम करा. इतका द्वेष पाहून खरंच वाईट वाटतंय. पण तुम्ही माझ्या मुलीची काळजी करू नका, तुमच्या मुलांना शिकवा.”

माहीने ट्रोल करणाऱ्यांना खडे बोल सुनावले. त्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करून तिचं समर्थन केलं आहे. तु तुझ्या मुलीला चांगल्या प्रकारे सांभाळतेस, त्यामुळे अशा लोकांकडे लक्ष देण्याची गरज नाही, अशा कमेंट्स चाहत्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.