दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खरेदीसाठी लगबग पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच अनेकजण आपल्या प्रियजनांना, मित्रमंडळींना विविध भेटवस्तूही देताना दिसत आहेत. नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेत्री श्रेया बुगडेला एक भेटवस्तू पाठवली आहे.

उत्तम अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून तिला ओळखले जाते. श्रेया बुगडेने ‘कॉमेडी क्वीन’ अशी ओळख मिळवली. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे.
आणखी वाचा : मुंबईच्या वाहतूक कोंडीला कंटाळली रिंकू राजगुरु, फोटो पोस्ट करत म्हणाली…

shreya bugde
श्रेया बुगडे

यात श्रेयाने एका भेटवस्तूचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेल्या भेटवस्तू पाहायला मिळत आहेत. त्याबरोबरच त्यांनी दिपावली आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. तिने ही भेटवस्तू स्वीकारत त्यांचे आभार मानले आहेत.

आणखी वाचा : प्रियदर्शनी इंदलकरला शरद पोंक्षेंच्या हस्ते मिळाला महत्त्वाचा पुरस्कार, म्हणाली “अशी प्रोत्साहनाची थाप…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान श्रेया बुगडेची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. ती शाळेत असल्यापासून अभिनय करायची. तिला ‘फू बाई फू’ या कार्यक्रमामुळे संधी मिळाली. तिने या मंचावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर तिला ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे खरी प्रसिद्धी मिळाली. या कार्यक्रमामुळे ती घराघरात पोहोचली.