‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेले कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. याच कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेला विनोदवीर अभिनेता गौरव मोरे हा नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून त्याला ओळखले जाते. गौरव हा सध्या लंडनला आहे. नुकतंच तो एक व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे.

गौरव मोरे हा सध्या लंडनमध्ये आहे. नुकतंच त्याने एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो वडापाव आणि लंडनबद्दल बोलताना दिसत आहे. यावेळी त्याच्याबरोबर अभिनेत्री मनिषा शिंदेही दिसत आहे.
आणखी वाचा : “…तर मी दोन मुलांची आई असते”, केतकी चितळेच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली “वयाच्या चौथ्या वर्षी…”

या व्हिडीओच्या सुरुवातीला गौरव हा लंडनमध्ये फिरताना दिसत आहे. त्यावेळी मनिषा ही वडापाव खात असते. ती गौरवला हाय, हॅलो करुन “वडापाव खाणार का?”, असं विचारते. त्यावर गौरव हा “तुम्ही लंडनमध्ये येऊन पण वडापाव खाणार का? इकडंच पिझ्झा, बर्गर असं काही तरी ट्राय करा, आपण आपल्याकडे जाऊन तर हे खाणारचं ना. काय बोलणार, जाऊ दे”, असे तिला म्हणतो.

त्यावर मनिषा ही त्याला “ए मी वडापावच खाणार”, असे सांगते. यानंतर काही वेळाने गौरव हा वडापाव खात बसलेला असतो. त्याला पाहून मनिषा म्हणते, “काय वडापाव. पिझ्झा बर्गर काही खाता येत नाही का?.” त्यावर गौरव म्हणतो, “जगात कुठेही जा, वडापाव खाण्याशिवाय पर्याय नाही. त्याशिवाय पोट भरलंय असं वाटतच नाही.” त्यानंतर तो मनिषाला वडापाव खाणार का? असे विचारतो आणि ते दोघेही वडापाव त्याबरोबरच मिरची खातात.

आणखी वाचा : Video : प्रिया मराठेचा ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेला रामराम, कारण सांगत म्हणाली “ही भूमिका…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान या व्हिडीओला गौरव मोरेने हटके कॅप्शन दिले आहे. “जगात कुठे पण आपला वडापावच लयभारी”, असे कॅप्शन गौरवने या व्हिडीओला दिले आहे. त्याचे चाहते यावर कमेंट करत त्यांनाही वडापाव आवडत असल्याचे सांगत आहेत.