‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर या कार्यक्रमाचा चाहतावर्ग जगभरात आहे. गेल्या आठ वर्षांपासून या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. गेली अनेक वर्षे सचिन गोस्वामी या कार्यक्रमाचं दिग्दर्शन करत आहेत. यामधील कलाकारांप्रमाणे दिग्दर्शक सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी या दोघांचाही चाहतावर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे. विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना खळखळून कसं हसवायचं हे या दोन्ही दिग्दर्शकांना परिचयाचं आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी २० मे रोजी १३ मतदारसंघांमध्ये मतदान करण्यात आलं. मुंबईतल्या सहा मतदारासंघांसह ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, धुळे, दिंडोरी, आणि भिवंडी अशा १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. बॉलीवूडसह मराठी कलाविश्वातीस बऱ्याच कलाकारांनी २० मे रोजी मतदान करत आपलं कर्तव्य बजावलं. याच संदर्भात आता हास्यजत्रेचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी पोस्ट शेअर केली आहे.

Gharoghari Matichya Chuli fame Sumeet Pusavale and Reshma Shinde dance on sooseki Song Of Pushpa 2 The Rule Movie
Video: ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘सूसेकी’ गाण्यावर हृषिकेश-जानकीचा मराठमोळा ठसका, नेटकरी म्हणाले, “एकच नंबर…”
Laxmichya Paulanni fame Apurva Sapkal Dhruv Datar dance on pushpa 2 sooseki song
“शेवटी नैनाने तिच्या तालावर…”, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अपुर्वा सकपाळ व ध्रुव दातार यांचा ‘पुष्पा-२’च्या गाण्यावर जबरदस्त डान्स, चाहते म्हणाले…
abhijeet khandkekar and avni taywade make aamras for Tujhech Mi Geet Gaat Aahe team
Video: ‘तुझेच मी गीत गात आहे’च्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी स्वरा आणि मल्हारने केला खास आमरस, पाहा व्हिडीओ
maharashtrachi hasya jatra fame all actors went to alibaug
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे कलाकार गेले होते अलिबागला! एकत्र केली धमाल, वनिता खरातच्या नवऱ्याने शेअर केला व्हिडीओ
Aishwarya and Avinash Narkar son amey girlfriend play role in zee marathi lakhat ek amcha dada serial
ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या मुलाच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का? ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार
Tharla tar mag fame Ketki palav shared video which went viral on social media
“नजर लागणार अशी…”, ‘ठरलं तर मग’ फेम केतकी पालवचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले…
Actress chahat khanna live in relationship with rohan gandotra
दोन लग्नं, घटस्फोट अन् दुसऱ्या पतीवर जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवल्याचे आरोप; ३७ वर्षीय अभिनेत्री तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत
Vignesh Kamble is now in charge of directing of tejashri pradhan serial Premachi goshta
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा आता ‘यांच्या’ हाती, आधी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे पती होते दिग्दर्शक
Tuzech Mi Geet Gaat Aahe artis dance On Angaaron Song Of Pushpa 2 The Rule Movie Video Viral
Video: लवकरच बंद होणाऱ्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील कलाकारांचा ‘अंगारों’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

हेही वाचा : “ट्रोल केलं, नातेवाईकांचे फोन आले”, रोहित-जुईली लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल स्पष्टच बोलले; म्हणाले, “नाक खुपसू नका…”

सचिन गोस्वामी लिहितात, “काल मतदानाला मी आणि सविता सकाळी ७: ३०ला केंद्रावर गेलो. नेमका आमचा नंबर असलेल्या खोलीबाहेर मोठी रांग…ड्युटीवरील पोलीस कर्मचारी मला निरखून बघत अंदाज काढत होता. शेवटी त्याने निष्कर्ष काढला आणि मला म्हणाला.. ओ तुम्ही तिथं का रांगेत? या इकडे इकडून आत जा…मी गडबडलो…बराच वेळ उभं राहिल्याने पोटऱ्यात गोळे आले होतेच…पडत्या फळाची आज्ञा म्हणून तिथं जाऊन थांबलो.. आता मी ३ नंबरवर होतो..हळूच त्यांच्याकडे पाहून हसत थँक्यू म्हटलं…त्यावर तो म्हणाला ओ, सिनियर सिटिझन रांगेत चक्कर येऊन पडले तर डोक्याला ताप आम्हालाच होणार नाही का? पांढऱ्या केसांमुळे मला सिनियर सिटिझन कॅटेगरीत आणलं आहे…काय करावं…”

हेही वाचा : मराठमोळा साज, पेशवाई लूक अन्…; ‘असं’ पार पडलेलं मुग्धा-प्रथमेशचं लग्न, ५ महिने पूर्ण होताच शेअर केला व्हिडीओ

दरम्यान, सचिन गोस्वामींच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. “हा स्किटचा विषय आहे”, “मी ही त्याच रांगेत आहे”, “सर तुम्ही राजपुत्र आहात म्हणून, रांग बदलली असेल”, “सिनियर म्हणून नाही सोडलं .. राजपुत्र म्हणून पुढे जागा दिली”, “यावर एक जोरदार स्किट होऊन जाऊद्या चौघुलेंना घेऊन” अशा मजेशीर कमेंट्स नेटकऱ्यांनी गोस्वामी यांच्या पोस्टवर केल्या आहेत.