गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही लोकप्रिय मालिका आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. १६, जूनला महाअंतिम भागाने ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा गोड शेवट होणार आहे. ज्या क्षणाची प्रेक्षक गेली दोन वर्ष आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर पाहायला मिळणार आहे. अशातच स्वरा आणि मल्हाराने मालिकेच्या चित्रीकरणाचा शेवट गोड पदार्थ केल्याचं समोर आलं आहे. दोघांनी सेटवर संपूर्ण मालिकेच्या टीमसाठी खास आमरसाचा बेत केला होता. याचा व्हिडीओ ‘स्टार प्रवाह’ आणि मालिकेच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला आहे.

अभिनेता अभिजीत खांडकेकर, उर्मिला कोठारे, प्रिया मराठे, तेजस्विनी लोणारी, अवनी तायवाडे, अवनी जोशी, दीप्ती जोशी, उमेश बने, पल्लवी वैद्य, शैलेश दातार अशी तगडी कलाकार मंडळी असलेली ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका २ मे २०२० पासून सुरू झाली होती. संगीतावर नितांत प्रेम असणाऱ्या बाप-लेकीची ही कथा प्रेक्षकांच्या अल्पावधीत पसंतीस पडली. तसंच मालिकेतील स्वरा, मल्हार, वैदही, मोनिका, पिहू, निरंजन, क्षमा, विजय, विक्रम अशा सगळ्या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात कायम स्थान निर्माण केलं. यादरम्यान मालिकेत बऱ्याच इतर कलाकारांच्या एन्ट्री झाल्या. त्यामधील उषा नाईक, हार्दिक जोशी व अभिजीत केळकर यांनी साकारलेली पात्र चांगलीच गाजली. अशी ही लोकप्रिय कलाकारांची लोकप्रिय मालिका काही तासांत प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Tuzech Mi Geet Gaat Aahe artis dance On Angaaron Song Of Pushpa 2 The Rule Movie Video Viral
Video: लवकरच बंद होणाऱ्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील कलाकारांचा ‘अंगारों’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
Star Pravah Serial Tuzech Mi Geet Gaat Aahe last episode
Video: गेली दोन वर्षे प्रेक्षक वाट पाहत असलेला क्षण अखेर येणार, ‘तुझेच मी गीत गात आहे’च्या महाअंतिम भागात घडणार ‘ही’ गोष्ट
marathi serial trp list
TRPच्या शर्यतीत टॉप ५ मध्ये असणारी मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! ‘ठरलं तर मग’ पुन्हा अव्वल, तर दुसऱ्या स्थानी…
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Aishwarya and Avinash Narkar son amey girlfriend play role in zee marathi lakhat ek amcha dada serial
ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या मुलाच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का? ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
marathi actor Abhijeet Shwetchandra exit form shubhvivah marathi serial
‘शुभविवाह’ मालिकेतून अचानक ‘या’ अभिनेत्याची एक्झिट, आता ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेता झळकला ‘या’ भूमिकेत
aashay kulkarni exit from muramba serial
काजल काटे, स्मिता शेवाळेनंतर आणखी एका अभिनेत्याची ‘मुरांबा’ मालिकेतून एक्झिट; म्हणाला, “प्रेक्षकहो…”

हेही वाचा – अशोक सराफ यांना सात तास बसवलं होतं पोलीस ठाण्यात! स्वत: सांगितला धमाल किस्सा, वाचा

मालिकेतील मोनिकाच्या पापांचा घडा भरला असून ती आंधळी असल्याचं नाटक मल्हारसमोर उघड झालं आहे. तसंच वैदहीचा खूनही तिनं केल्याचं सत्य मल्हारसमोर आलं आहे. त्यामुळे आता मालिकेचा शेवट गोड होणार आहे. प्रेक्षक गेली दोन वर्षे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण शेवटी दाखवण्यात येणार आहे. अखेर खऱ्या बाप-लेकीची म्हणजेच मल्हार-स्वराची भेट महाअंतिम भागात पाहायला मिळणार आहे. मालिकेच चित्रीकरण काही दिवसांपूर्वीचं संपलं असून या शेवटच्या दिवशी मल्हार व स्वराने स्वतःच्या हाताने आमरस करून संपूर्ण टीमचं तोंड गोड केलं.

मल्हारने खास स्वराला आमरस कसा बनवायचा शिकवला. त्यानंतर सर्वांनी मल्हार व स्वराने बनवलेल्या आमरसावर चांगलाच ताव मारला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या मुलाच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का? ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार

दरम्यान, ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेची जागा ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ नवी मालिका घेणार आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता समीर परांजपे यांची प्रमुख भूमिका असलेली ही नवी मालिका १७ जूनपासून रात्री ९ वाजता पाहायला मिळणार आहे.