‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेहमी चर्चेत असतात. ते कामाव्यतिरिक्त आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींवर आपलं मत मांडत असतात. अलीकडेच त्यांनी प्राजक्ता माळीबाबत भाजपा आमदार सुरेश धस यांनी केलेल्या विधानावरून निषेध नोंदवला होता. ते म्हणाले होते की, ज्या समाजात महिलांचा सन्मान राखला जातो तो समाज सभ्य समजला जातो. कलेचा आणि कलावंतांचा आदर जपणारा समाज सुसंस्कृत समाज असतो. प्राजक्ता माळीबाबत जे घडतंय ते निषेधार्ह आहे, क्लेषदायक आहे. आपण निकोप सुदृढ समाजाचा आग्रह धरू या. त्यानंतर आता नुकतीच सचिन गोस्वामी यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे.

सचिन गोस्वामी यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, कलावंत सामाजिक राजकीय प्रश्नांवर व्यक्त का होत नाही? अमुक अमुक झालं तेव्हा झोपला होता काय? असा प्रश्न सर्रास, नियमित व्यक्त होणाऱ्या आणि अजिबात व्यक्त न होणाऱ्या कलाकाराला नेहमीच विचारला जातो. माझ्याबाबत सांगायचं तर मी वारंवार सोभवताली घडणाऱ्या घटनांवर व्यक्त होत आलोय. मणिपूर, निर्भया बलात्कार,खून, बदलापूर बालिकांवरील अत्याचार, खैरलांजी, उत्तरप्रदेशातील मोबलिंचिंग, पालघर साधुंचा निर्घृण खून, साक्षी मलिक, महिला पहिलवान आवहेलना, शेतकरी आंदोलन, मराठा मोर्चा, त्यांवरील लाठीचार्ज, ईव्हीएम, सामाजिक एकोपा बिघडवण्यासाठी द्वेषयुक्त वातावरण निर्माण केलं जातंय याबाबतची हतबलता, वाढत चाललेली गुन्हेगारी, संविधान जपण्याची काळजी, या आणि अशा अनेक मुद्द्यांवर, घटनांवर मी बोललो, व्यक्त झालो आहे. पण हल्ली एकूणच सामाजिक आणि राजकीय परिस्थती किळसवाणी झालीय आणि हळुहळू बातम्यांपासून, न्यूज चॅनलपासून अलिप्त झालो. व्यक्त होणं कमी केलं.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम जान्हवी किल्लेकर लवकरच नव्या दमदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार, ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत झळकणार

पुढे सचिन गोस्वामींनी लिहिलं, “पूर्वी व्यक्त झालो की माझं मत हे वैयक्तिक मानलं जायचं. पण हास्यजत्रा लोकप्रिय झाल्यानंतर मात्र ते हास्यजत्रेच्या दिग्दर्शकाचं म्हणून प्रसिद्धी माध्यमांच्या वतीते प्रसारित होऊ लागलं. माझ्या टीममध्ये वेगवेगळ्या विचारधारेचे लोक आहेत. मी प्रत्येकाच्या विचार, आहार, विहार स्वातंत्र्याचा आदर करतो. त्यामुळे माझं मत ज्यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात घेतलं जाऊ लागलं तेव्हापासून व्यक्त होणं कमी केलं. समाजमाध्यमांवर व्यक्त झालो नाही म्हणजे सध्या घडणाऱ्या घटनांनी व्यथित होत नाही असं नाही. बीडच्या घटनेने अस्वस्थ झालोच होतो. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्त्येने अस्वस्थ झालोच होतो. संविधानाच्या अनादराचा निषेध म्हणून शांत पणे आंदोलन करणारा विद्यार्थी न्यायालयीन कोठडीत मृत्यू पावतात हे क्लेषदायकच आहे. त्याचं दुःख होतंच आहे.”

“आज राजकारणात नीतिमत्ता, सभ्यता, सुसंस्कृतपणा हरवलाय. दहशत आणि बेछुट ट्रोलिंगने मोकळे पणाने व्यक्त होणं कलावंत टाळू लागले आहेत. कलावंत, जो सॉफ्ट टार्गेट आहे तो त्याला वाटतं तसं निर्भीड पणे बोलू शकेल असं पोषक वातावरण खरंच आहे? ट्रोलर्सच्या झुंडीना तोंड देत बसणं प्रत्येकाला शक्य आहे? ज्यांच्या दहशतीने आपल्या गावचं, शहराचं शांत जगणं हिसकावले आहे, ज्यांच्या गुंडगिरीने, भ्रष्ट्राचाराने, आपण त्रस्त आहोत अशाच लोकप्रतिनिधींना आपण सातत्याने का निवडून देत आहोत? हा विचार आपण करतो? कलावंतांकडून निर्भयतेची अपेक्षा करताना या गोष्टीही विचारात घेतल्या पाहिजे, अर्थात तरीही मी बोलतो..शक्य तिथे, जमल्यास माझ्या कलाकृतीत ही, असो… २०२४ संपतंय त्या निमित्ताने हा आढावा..२०२५ टोलमुक्त महाराष्ट्र होवो ना होवो, ट्रोलमुक्त तरी व्हावा ही अपेक्षा,” अशी पोस्ट सचिन गोस्वामी यांनी लिहिली आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: चक्क अविनाशने चाहतला तर विवियनने श्रुतिकाला नॉमिनेशन टास्कमध्ये केलं सुरक्षित! जाणून घ्या नेमकं काय घडलं?

हेही वाचा – Video: झूम बराबर झूम…; कौमुदीच्या संगीत सोहळ्यात ‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखचा पत्नीसह जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सचिन गोस्वामींच्या या पोस्टवर काही नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “लोक काय दोन्ही तोंडाने बोलत असतात, त्यांच्या ट्रोल करण्याकडे लक्ष देऊ नका सर. रिकामटेकड्या आणि मूर्ख लोकांना दुसरे उद्योग नसतात.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, सर काहीही होऊ द्या, असंच मनापासून व्यक्त व्हा, अशी प्रेमळ सुचना आणि नुतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.