scorecardresearch

“मी मिमिक्री करते हे अशोक मामांना कळल्यानंतर…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील एका अभिनेत्रीने त्यांच्यासाठी पोस्ट लिहिली आहे.

chetana bhat ashok saraf
चेतना भट्ट अशोक सराफ

मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी यंदा वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. त्याबरोबर त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. काही दिवसापूर्वी अशोक सराफ यांना ‘झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा’च्या जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी उपस्थित असलेले कलाकार भावूक झाले. नुकतंच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील एका अभिनेत्रीने त्यांच्यासाठी पोस्ट लिहिली आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार कायमच चर्चेत असतात. या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. नुकतंच या कार्यक्रमातील प्रसिद्ध अभिनेत्री चेतना भटने एक पोस्ट शेअर केली.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’साठी प्रियदर्शनी इंदलकरला देण्यात आलेला नकार, कारण…

चेतनाने तिच्या इन्स्टाग्रामवर अशोक सराफ यांच्याबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. याला तिने हटके कॅप्शनही दिले आहे. “एकतर अशोक मामांसारख्या मोठ्या कलाकाराला भेटण्याचा आनंद आणि वर त्यांना मी त्यांची मिमिक्री करते हे कळल्यानंतरचे एक्सप्रेशन्स…” असे चेतना भटने म्हटले आहे.

आणखी वाचा : “एका मोठ्या आजारातून बाहेर पडणाऱ्या…” जुई गडकरीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान चेतना भट ही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात विविध विनोदी पात्र साकारताना दिसते. तिच्या या भूमिकांचे अनेकदा कौतुकही होते. चेतना भटचा पती मंदार चोळकरने ‘फुलराणी’ या चित्रपटात मोठी भूमिका बजावली होती. मंदार हा प्रसिद्ध गीतकार आहे. त्याने या चित्रपटासाठी गाणी लिहिली आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 15:53 IST

संबंधित बातम्या