‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. अभिनेता आणि विनोदवीर गौरव मोरेला या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता अभिनेता आपल्या करिअरमध्ये एक पाऊल पुढे टाकत लवकरच हिंदी चित्रपटात झळकणार आहे.

हेही वाचा : “माझ्या नावासह सापाचा इमोजी…”, करण जोहरने ट्रोलर्सला सुनावलं; म्हणाला, “विचित्र कमेंट्स…”

महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना खळखळून हसवणारा गौरव मोरे लवकरच हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यासंदर्भात अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. “टीम संगी के संग” असे कॅप्शन त्याने या पोस्टला दिले आहे. गौरव मोरेच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘संगी’ असे आहे.

हेही वाचा : “छोटी भूमिका असूनही…”, रवी जाधव यांची हेमांगी कवीसाठी खास पोस्ट, म्हणाले…

मराठमोळा अभिनेता गौरव मोरेसह ‘संगी’ चित्रपटात विद्या मालवडे, संजय बिश्नोई आणि शाकिब हाश्मी हे कलाकार महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. मालिकेच्या कलाकारांनी नव्या चित्रपटाच्या सेटवरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमीत कुलकर्णी करणार आहेत.

हेही वाचा : “शिवराय प्रेमींसाठी आऊसाहेब असणारी व्यक्ती…”, मृणाल कुलकर्णींसाठी सूनबाईंची खास पोस्ट; म्हणाली, “एकत्र काम करून…”

View this post on Instagram

A post shared by Sharib Hashmi (@mrfilmistaani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गौरव मोरेने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने “कृपया, हा चित्रपट मराठीमध्ये पण डब करा…हा चित्रपट आम्हाला फक्त गौरव मोरेसाठी मराठीत पाहायचा आहे.” अशी कमेंट केली आहे. तर, दुसऱ्या एका युजरने “गौरव मोरे आहे म्हणजे हा चित्रपट दमदार असणार” अशी प्रतिक्रिया या पोस्टवर दिली आहे.