सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम आज प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक आवडीने पाहतात. या कार्यक्रमामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांचे हजारो चाहते आहेत. त्यातीलच एक कलाकार म्हणजे पृथ्वीक प्रताप. पृथ्वीकने या कार्यक्रमामध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

आणखी वाचा – “१५ कोटींसाठी सतीश कौशिक यांची हत्या केली” पत्नीच्या आरोपावर व्यावसायिकाचं उत्तर, म्हणाला, “होळी पार्टीच्या…”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ बरोबरच पृथ्वीक ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ या मालिकेमध्येही काम करताना दिसतो. पृथ्वीक त्याच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करू इच्छित आहे. पण यादरम्यान त्याला अनेक कठीण प्रसंगांचाही सामना करावा लागला. याबाबतच त्याने आता खंत व्यक्त केली आहे.

पृथ्वीकला काही भूमिकांसाठी नाकारण्यात आलं. पण यामागचं कारणही काहीसं विचित्र होतं. याबाबत त्याने स्वतः भाष्य केलं आहे. ‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये पृथ्वीक म्हणाला, “वेगवेगळ्या कारणांमुळे मला माझ्या आयुष्यामध्ये नकारांचा सामना करावा लागला. चांगलं काम करुनही माझ्याबाबत काही वेगळ्या गोष्टी घडल्या आहेत”.

आणखी वाचा – Video : सुप्रसिद्ध रॅपरचं २७व्या वर्षी निधन, गाणं गात असतानाच स्टेजवर कोसळला अन्…; ‘तो’ व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांमध्ये येईल पाणी

“सोशल मीडियावर माझे कमी फॉलोवर्स आहेत म्हणून मला नाकारण्यात आलं. तुझे सोशल मीडियावर एक लाखही फॉलोवर्स नाहीत. म्हणून तू या भूमिकेसाठीही योग्य नाही असं काही लोकांनी मला सांगितलं. काम चांगलं असताना या गोष्टींना प्राधान्य का दिलं जातं? हे मला अजूनही समजलेलं नाही. या गोष्टींना प्राधान्य देऊ नये. लोकांनी त्या व्यक्तीचं काम पाहिलं पाहिजे”. पृथ्वीकने पहिल्यांदाच आपल्या करिअरबाबत तसेच संपूर्ण प्रवासाबाबत भाष्य केलं आहे.