‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरलं. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यात हा कार्यक्रम अगदी यशस्वी ठरला. आता या कार्यक्रमात काम करणाऱ्या कलाकारांची एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ असं या मालिकेचं नाव आहे. या मालिकेच्यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत समीर चौघुले यांनी आपल्या पत्नीबाबत भाष्य केलं.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चांवर समीर चौघुलेंनी सोडंल मौन, म्हणाले, “कार्यक्रम बंद…”

‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर येत्या ५ जानेवारीपासून प्रसारित होणार आहे. या मालिकेत समीर पत्नीला घाबरणारा नवरा असं पात्र साकारत आहे. याबाबतच ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये खऱ्या आयुष्यात तुम्ही तुमच्या पत्नीला किती घाबरता असा प्रश्न विचारण्यात आला.

तुम्ही तुमच्या पत्नीला घाबरता का? या प्रश्नावर क्षणाचाही विलंब न लावता समीर चौघुले म्हणाले, “मी या मालिकेतील पात्राप्रमाणेच घरीही आहे. आता मी बायकोला घाबरत नाही असं म्हटलं तर समस्या निर्माण होईल. बायकोला घाबरतो म्हटलं तरी ट्रोलिंग सुरू होणार. बायकोला घाबरणारा घरकोंबडा वगैरे असं मला म्हणणार.”

आणखी वाचा – “आम्ही दोघंही सिगरेट व दारू…” मुलांनी विचारलेल्या प्रश्नावर रितेश देशमुखने दिलेलं उत्तर, स्वतःच सांगितला किस्सा

समीरने या प्रश्नाचं अगदी मजेशीर उत्तर दिलं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’बरोबरच दत्तू मोरे, वनिता खरात, शिवाली परब, प्रभाकर मोरे यांसारखे अनेक कलाकार ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’मध्ये काम करताना दिसतील. तर अभिनेते मकरंद अनासपुरे यांचीही या मालिकेमध्ये मुख्य भूमिका आहे.