दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दिवशी श्रीकृष्णाची आराधना केली जाते. हिंदू धर्मीयांमध्ये श्रीकृष्ण जन्म पवित्र उत्सव मानला जातो. या दिवशी अनेक घराघरांत, मंदिरात रात्री १२ वाजता श्रीकृष्णाची बाल मूर्ती पाळण्यात ठेवून मनोभावे पूजा करीत जन्माष्टमीचा सोहळा साजरा होतो. नुकतंच अभिनेते आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनी त्यांच्या घरातील श्रीकृष्ण जन्माष्टमीचा खास व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनेते आदेश बांदेकर यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी त्यांच्या देवघराची झलक दाखवली आहे. त्याबरोबर त्यांनी श्रीकृष्णाची मनोभावे पूजा करीत जन्माष्टमीचा सोहळा साजरा केल्याचेही यात दाखवले आहे.
आणखी वाचा : इंडिया आणि भारत वादादरम्यान अक्षय कुमारचा मोठा निर्णय, आगामी चित्रपटाच्या नावात केला बदल

या व्हिडीओच्या सुरुवाताली एका चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची बाल मूर्ती ठेवण्यात आली आहे. त्यावर तुळस, चाफा आणि मोगऱ्याच्या फुलांनी सजावर करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी मोठ्या थाटात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला आहे.

त्याबरोबरच आदेश बांदेकरांच्या देवघरात गणपतीची चांदीची मूर्ती, आई अंबाबाईचा मुखवटा आणि तिचे सिंहासन, मोठा शंख, राम लक्ष्मण सीता, शंकराची पिंडीही ठेवण्यात आली आहे.

आणखी वाचा : “पांढरे कपडे घालून खुर्चीवर…”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा स्टँप पेपर घोटाळ्याच्या मुख्य आरोपीबद्दल मोठा खुलासा, म्हणाला “मी अब्दुल करीम तेलगीला…”

तसेच बांदेकर कुटुंबीय श्री स्वामी समर्थांचे मोठे भक्त असून त्यांच्या घरी स्वामींच्या चांदीच्या पादुका आहेत. तसेच श्री स्वामी समर्थ, श्री सिद्धीविनायक, श्री दत्तगुरु यांचेही मोठे फोटो पाहायला मिळत आहे. तसेच त्यांच्या घरी श्रीकृष्णाची मोठी, सुंदर आणि सुबक अशी मुर्तीही पाहायला मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी आदेश बांदेकरांनी त्यांच्या घराची झलकही दाखवली होती. यानंतर आता त्यांनी त्यांच्या घरातील देवघराची झलक दाखवली आहे. त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी त्यांचे हे देवघर फारच छान असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी हार्ट, नमस्काराचा इमोजी शेअर केला आहे.