छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता अक्षय वाघमारे दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. अक्षय वाघमारेची पत्नी व डॅडी अरुण गवळींची लेक योगिता गवळी दुसऱ्यांदा गरोदर आहे. अक्षयने एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करून ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली.
‘घरोघरी मातीच्या चुली’ फेम अक्षय वाघमारेने इन्स्टाग्रामवर ‘सीझन २’ असं कॅप्शन देऊन एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यात योगिता बेबी बंप फ्लाँट करताना दिसतेय.
अक्षयने ऑफ व्हाइट रंगाचा कुर्ता घातलाय व त्यावर मरून रंगाचं जॅकेट घातलंय. तर योगिताने ऑफ व्हाइट रंगाची साडी नेसली आहे आणि मरून शेला घेतलाय. योगिता पारंपरिक मराठी लूकमध्ये तयार झालेली फोटोमध्ये दिसतेय.
पाहा पोस्ट
योगिताच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होस्ट करणाऱ्याने इन्स्टाग्रामवर अक्षयला टॅग करून व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत अक्षय व योगिताची एंट्री, घरातील सदस्यांचे आणि लहान मुलांचे डान्स, दोघांचं फोटोशूटची झलक पाहायला मिळतेय.
पाहा व्हिडीओ-
अक्षय वाघमारेच्या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री सुरेखा कुडची यांनीही ‘अभिनंदन’ अशी कमेंट अक्षयच्या पोस्टवर केली आहे.
दरम्यान, अक्षय वाघमारे व योगिता गवळी यांनी २०१९ मध्ये लग्न केलं. या जोडप्याला लग्नानंतर वर्षभरातच मुलगी झाली. त्यानंतर आता योगिता गवळी दुसऱ्यांदा गरोदर आहे. लवकरच त्यांच्या घरी दुसऱ्या सदस्याचं आगमन होणार आहे.
३७ वर्षांच्या अक्षय वाघमारेच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘ती फुलराणी’, ‘खुर्ची,’ ‘दोस्तीगिरी,’ ‘बेधडक,’ ‘बस स्टॉप’ या कलाकृतींसाठी ओळखला जातो. तसेच अक्षय वाघमारे ‘बिग बॉस मराठी ३’मध्येही झळकला होता.
