मराठी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी गेली अनेक दशकं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. नुकतंच अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या दरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’ या उपक्रमाद्वारे ज्येष्ठ रंगकर्मी, ज्येष्ठ कलाकार, बॅकस्टेजवर काम करणारे तंत्रज्ञ, ज्यांच्या घरी खरंच पैशांची आवश्यकता आहे किंवा वयामुळे ज्यांना काम करणे शक्य होत नाही. अशा गरजू लोकांना मदत करण्यात येणार आहे. नुकतंच या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी पत्नी निवेदिताबद्दल एक गंमतीशीर खुलासा केला.
आणखी वाचा : Video : “परदेशात बसून धमक्या…” दाऊद इब्राहिमबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर समीर वानखेडेंचे रोखठोक उत्तर, म्हणाले “खूप लहान गुन्हेगार…”

यावेळी मंचावर आल्यानंतर अशोक मामा म्हणाले, “आताच माझ्या बायकोने मला दम दिलाय की जरा कमी बोल…! तेव्हा मला कमी बोलणं हे भागच आहे. तसं पाहिलं तर मी सुद्धा कमीच बोलतो. घरी तर मी जास्त बोलतच नाही.” अशोक सराफ यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : “…त्यात घर चालत नव्हतं”, शशांक केतकरने केला मालिकेच्या मानधनाबद्दल खुलासा, म्हणाला “१२०० रुपये…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’ या कार्यक्रमात पडद्यामागील २० कलाकारांचा सन्मान करण्यात आला. अशोक सराफ यांच्याकडून या कलाकारांना प्रत्येकी ७५ हजार रुपये देण्यात आले. अशोक सराफ यांनी रंगभूमीवरील पडद्यामागील कलाकारांसाठी उचललेलं हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे.