मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणून हार्दिक जोशीला ओळखले जाते. सध्या तो त्याच्या आगामी ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमात व्यस्त आहे. मात्र या कार्यक्रमादरम्यान हार्दिक जोशीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हार्दिक जोशीच्या वहिनीचं निधन झालं आहे. त्याने स्वत: भावूक पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

हार्दिक जोशीने नुकतंच इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यात तो, अक्षया देवधर, त्याची वहिनी असे संपूर्ण कुटुंब दिसत आहे. या पोस्टला हार्दिकने भावुक होत कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “हा ‘झिम्मा’ आधीपेक्षा…”, ‘झिम्मा २’बद्दल चिन्मय मांडलेकरने केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

हार्दिक जोशीची पोस्ट

“ज्योती वहिनी तू आज आमच्यात नाहीयेस पण तूझ अस्तित्व आमच्यात कायम राहील..जाऊ बाई गावात हा जो नवीन शो मी करत आहे झी मराठीवर तो फक्त तुझ्यामुळे तो पुर्ण शो मी फक्त तुलाच डेडिकेट करतोय कारण तू माझा हात हातात घेऊन प्रॉमिस घेतलं होतस की हार्दिक काही झाल तरी हा शो तू करणारच आहेस आणि योगायोग असा आहे की 4 डिसेंम्बर च्या दिवशी हा शो टीव्हीवर दिसायला सुरुवात होणार आहे आणि त्याच दिवशी तुझा वाढदिवस आहे. मि नेहमी कामाला जाताना तुला नमस्कार करायचो तेव्हा कायम डोक्यावर हात फिरऊन तू मला आशीर्वाद द्यायची

तुझा आशीर्वाद असाच कायम माझ्या पाठीशी असुदे, आज मि जे काही आहे त्यात तुझा खुप मोठा वाटा आहे. तु सदैव आई, बहिण, मैत्रीण म्हणुन माझ्या सोबत पाठीशी होतीस तशीच कायम रहा ही विनंती करतो. तुझी उणीव कायम भासत राहिल Miss you @jyoti.naisha माझी लाडकी वहिनी मला कधी विसरु नको, Always love you always khup khup miss you”, असे हार्दिक जोशीने म्हटले आहे.

आणखी वाचा : Jhimma 2 Review: जीवाभावाच्या मैत्रिणींच्या रियुनियनची भावुक करणारी गोष्ट; वाचा कसा आहे ‘झिम्मा २’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान हार्दिक जोशीच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे. तर काहींनी वहिनींना काय झाले होते, असा प्रश्न विचारला आहे. हार्दिक हा लवकरच ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.