scorecardresearch

Premium

“तुम्ही निलेश साबळेंची जागा घेऊ शकता” असं म्हणणाऱ्या चाहत्याला कुशल बद्रिकेचे उत्तर, म्हणाला…

“आज इतकी वर्ष गेली पण माझी ही सवय काही गेली नाही.”

nilesh sable kushal badrike

अभिनेता कुशल बद्रिके हा कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. कुशल बद्रिके हा ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे घराघरांत पोहोचला. कुशल बद्रिकेने आजवर प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी ठरला. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच कुशल बद्रिकेच्या चाहत्याने त्याच्या एक पोस्टवर कमेंट केली आहे. या कमेंटवर त्याने स्पष्टपणे उत्तर दिले आहे.

कुशल बद्रिकेने नुकतंच दिवाळीच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने दिवाळीची एक भन्नाट आठवण सांगितले आहे. कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याने बालपणीच्या दिवाळीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
आणखी वाचा : “ऐश्वर्या रायशी लग्न करण्यामागे तिचे सौंदर्य…” अभिषेक बच्चने सांगितले खरे कारण

disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
bachchu kadu eknath shinde 1
“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास भाजपाचे प्लॅन…” आमदार अपात्रतेवर बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
Tanushree Dutta on Her marriage
“…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”

कुशल बद्रिकेची पोस्ट

“ही एक खोडी मला बालपणापासून आहे, वात नसलेले आणि न पेटलेले “फटाके” गोळा करायचे आणि त्यातली दारू एकत्र करुन पेटवून द्यायची. त्याशिवाय माझी दिवाळी कधीच पूर्ण झाली नाही. आज इतकी वर्ष गेली पण माझी ही सवय काही गेली नाही, मला वाटतं,

दिवाळीचा फराळ संपल्यानंतर डब्बे नीट तपासून पाहिले तर तुकड्या तुकड्यात “चकली, शंकरपाळ्या” सापडतात ना! डब्याच्या तळाशी “करंजीचं सारण आणि अनारस्याच्या खसखस” मध्ये मिसळलेला जरासा “चिवडा” सापडतोच ना! तसंच आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यात उरलेलं थोडसं “बालपण” आपल्याला सापडतच !! फक्त डबे नीट तपासून घ्यायला हवेत, तळाशी कुठेतरी असतच हे “बालपण”. “अगदी लाडवातल्या “मनुक्या” एवढ का होईना, ते आपल्यात उरतच” असे कुशल बद्रिकेने म्हटले आहे.

त्याच्या या पोस्टवर एका चाहत्याने कमेंट केली आहे. कुशल सर, कधी कधी वाटतं की तुम्ही चुकीच्या फील्ड मध्ये आहात…जरा अजून लक्ष दिले तर तुम्ही योगेश आणि निलेशचा जॉब खाऊ शकता…., असे कमेंट एकाने केली आहे. त्यावर कुशलने त्याला स्पष्टपणे उत्तर दिले आहे.

आणखी वाचा : “…अन् नेहमी तुझ्याशिवाय अपूर्ण राहिन” अमृता खानविलकरने पतीसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद. पण एक पोस्ट लिहिणे वेगळा आणि गेली ८ वर्षे सातत्याने एक सुपरहिट शो लिहिणे वेगळा. डॉ. निलेश साबळे आणि योगेश शिरसाठ हे खूप मेहनती आणि चांगले लेखक आहेत सर… त्या पलीकडे ते माझे चांगले माझे मित्र सुद्धा आहेत, असे कुशल बद्रिकेने म्हटले आहे. त्याची ही पोस्ट व्हायरल होत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-11-2022 at 17:25 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×