‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते मिलिंद गवळी हे कायमच चर्चेत असतात. या मालिकेत ते अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारताना दिसतात. या मालिकेमुळेच ते घराघरात पोहोचले. नुकतंच मिलिंद गवळी यांनी त्यांच्या लेकीसाठी पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी त्यांची लेक काय काम करते याबद्दलही सांगितले आहे.

मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात ते त्यांची लेक मिथिलाबरोबर व्यायाम करताना दिसत आहे. याला त्यांनी हटके कॅप्शनही दिले आहे.
आणखी वाचा : “…म्हणून लोक आजारी पडत असतील का?” मिलिंद गवळींच्या पोस्टने वेधलं लक्ष

Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”
Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
34 Year Old Marries 80 Year Old Reel Star
८० वर्षांच्या रीलस्टारच्या प्रेमात महाराष्ट्रातील ३४ वर्षीय शीला झाली ‘दिवानी’; लग्नासाठी पार केले ६०० किमी अन् आता..

मिलिंद गवळींची पोस्ट

“व्यवसाय असा शोधा की आयुष्यभर आपल्याला काम करावंच लागणार नाही.
राजश्री प्रॉडक्शन आणि दर्शना तांबोळी यांचे खूप खूप आभार माझ्या लेकी बरोबर पुण्यात जाऊन गप्पा मारायची आणि तिच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करायची मला संधी मिळाली,
आपण आपल्या मुलांना त्यांच्या लहानपणापासून खूप काही शिकवत असतो,
पण आपल्याला कळतच नाही की आपली मुलं कधी मोठी होतात आणि आपल्यालाच त्यांच्याकडून शिकायला लागतं,
या मुलाखतीमध्ये मिथिला म्हणाली की “
मी हे प्रोफेशन यासाठी choose केलं की दिवसभराच्या कामानंतर मला stress नको होता ,तर शांत झोप हवी होती”, ही गोष्ट मी तिला शिकवायची राहून गेली होती,
कारण माझ्या उमेदीच्या काळात ही इतकी महत्त्वाची गोष्ट मलाच ठाऊक नव्हती, इतक्या गोष्टी मी आयुष्यात केल्या, पण हा विचार करायचा राहूनच गेला, सुदैवाने ज्या गोष्टीवर माझे इतकं प्रेम आहे, ज्या गोष्टीची मला लहानपणापासून आवड आहे, आणि ते म्हणजे ॲक्टिंग, आणि नकळतपणे त्यालाच प्रोफेशन म्हणून घेतल्यामुळे मला आयुष्यभर छान झोप लागली, असं म्हणतात की दिवसभरात इतकं माणसाने काम करावं की रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या मेल्यासारखी झोप लागायला हवी, आपण पैसे मिळवण्यासाठी एखाद काम निवडतो, आणि पैसे पण भरपूर मिळतात पण खूप स्ट्रेस येऊन माणसाची झोपच उडते, मिथिला शी गप्पा मारून मी खूपच शिकलो, आणि भारावून पण गेलो, हे एवढेस पिल्लू जिला मी तिच्या जन्मा वर अवघ्या 35 मिनिटांत लगेच कुशीत घेतलं होतं, नाजूक कापसाचा गोळा जसा, तिच आता इतकी strong झाली आहे, फक्त फिजिकली physically नाही तर मेंटली mentally सुद्धा.

आता जाणीव व्हायला लागली की आता या मुलीला शिकवायची नाही तर तिच्याकडून शिकायची आपल्यालाच गरज आहे. आपलं शरीर सुदृढ असणं, निरोगी असणं किती गरजेचा आहे, आणि आपलं शरीरच हा आयुष्याचा प्रवास आपल्याला घडवणार आहे, आणि तो आपल्या आयुष्याचा प्रवास फुल ऑफ एनर्जी full of energy आणि आनंदाने घडत असेल, तर तो सुखकारक नक्कीच होणार, त्यामुळे आपल्या शरीरात नको असलेले एक्स्ट्रा बॅगेज extra baggages काढून टाकणेगरजेचे आहे, आणि ते जर आपल्या ला जमत नसेल , तर मिथिला सारखा एखादा कोचला शोधा, आणि आपल्या आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरुवात करा. मी नशीबवान आहे की मला माझा हा कोच coach, माझ्याच घरी सापडला आहे”, असे मिलिंद गवळींनी यात म्हटले आहे.

आणखी वाचा : अभिज्ञा भावेपाठोपाठ आणखी एका मराठी अभिनेत्रीचा इन्फ्लुएन्सरवर संताप, म्हणाली “फक्त लोकप्रिय चेहरा…”

दरम्यान मिलिंद गवळींनी शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. यातील अनेकांनी मिलिंद गवळींची लेक मिथिलाच्या फिटनेसचे कौतुक केले आहे. तर काहींनी मिलिंद गवळींनाही शुभेच्छा दिल्या आहेत.