मराठी मनोरंजनसृष्टीतील एक बहुआयामी कलाकार म्हणून संकर्षण कऱ्हाडेला ओळखले जाते. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. सध्या संकर्षण हा नियम व अटी लागू या नाटकाच्या प्रयोगात व्यस्त आहे. या नाटकाच्या निमित्ताने त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

संकर्षण कऱ्हाडे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एक लहान मुलगा ‘पंढरीच्या विठूराया..’ ही कविता ऐकवताना दिसत आहे.

संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट

“प्लिज पहा , ऐका ..

आपली लिहिलेली , सादर केलेली कलाकृती कुठल्या वयोगटाच्या प्रेक्षकांना , कित्ती आवडू शकते ह्याची पावती देणारा आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा हा छोटा प्रेक्षक.. रसिक..
“नियम व अटी लागू” च्या बालगंधर्वच्या प्रयोगानंतर ह्या छोट्या दोस्ताने माझी “पंढरीच्या विठूराया..” हि कविता मला खूप आवडते.. मी ती पाठ केली आहे.. आणि शाळेत सादर पण केली.. असं सांगत मनापासून म्हणुन दाखवली.. भेटायला आलेले सगळे प्रेक्षक थांबून त्याचा परफॉर्मन्स पाहात होते.. मी त्यातला थोडा भाग रेकाॅर्ड केला .. आणि शेअर करतोय.. असेच प्रेम करत रहा.. भेटत रहा..”, असे संकर्षण कऱ्हाडेने म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान संकर्षण कऱ्हाडे हा सध्या विविध नाटकांच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. सध्या तो ‘तू म्हणशील तसं’, ‘संकर्षण via स्पृहा’ आणि ‘नियम व अटी लागू’ नाटकात काम करत आहे.