मराठी चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध कलाकारांच्या यादीमध्ये संकर्षण कऱ्हाडे हे नाव कायमच चर्चेत असते. मनोरंजनसृष्टीतील एक बहुआयामी कलाकार म्हणून त्याला ओळखले जाते. सध्या तो गौरी थिएटर निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या दौऱ्यासाठी अमेरिकेत गेला आहे. आता संकर्षण कऱ्हाडेने विमानतळावर रात्र काढावी लागली, याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

संकर्षण कऱ्हाडेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक फोटो पोस्ट केला आहे. यात तो बॅग घेऊन विमानतळावर बसल्याचे दिसत आहे. याला कॅप्शन देताना त्याने विमानतळावर रात्र काढावी लागली, याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : Video : “तुला बघते थांब…”, मृण्मयी आणि गौतमी देशपांडेचं भर सेटवर भांडण, व्हिडीओ आला समोर

“आजची रात्रं #airport वर. उद्या सकाळी ६.३० चं विमान आहे Oakland साठी…. तुमचं झालं असं कधी ..? रात्रं काढावी लागली Airport , Railway Station किंवा Bus stand वर..??” अशी पोस्ट संकर्षण कऱ्हाडेने केली आहे.

संकर्षण कऱ्हाडेच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. या फोटोवर एकाने “खूपच खेळाडू वृत्तीने हे घेतलंस”, अशी कमेंट केली आहे. त्यावर त्याने “तसं नाही, फोटो काढताना फक्त हसलोय”, असे संकर्षण कऱ्हाडेने म्हटले आहे.

Sankarshan Karhade comment 1
संकर्षण कऱ्हाडेची कमेंट

तसेच एकाने “माझ्याबरोबरही हे झालं आहे. मला एअरपोर्टवर राहावं लागलं होतं. पण तिथे असलेल्या दुसऱ्या व्यक्तींना पाहणं यात एक वेगळी गंमत असते आणि त्यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. तुम्हाला प्रवासासाठी शुभेच्छा”, अशी कमेंट केली आहे. त्यावर संकर्षणने “या विमानतळावर मोजून १५ लोक असतील, त्यात ९ आम्हीच आहोत”, असे कमेंट करत म्हटले आहे.

Sankarshan Karhade comment
संकर्षण कऱ्हाडेची कमेंट

आणखी वाचा : “…म्हणून मी बाजूला झाले”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परतण्याबद्दल विशाखा सुभेदार यांचं स्पष्ट वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान संकर्षण कऱ्हाडे हा पुढील काही दिवस ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिकत असणार आहे. ‘नियम व अटी लागू’ या नाटकाचे लेखन संकर्षण कऱ्हाडेने केले आहे. तर याचे दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णींनी केले आहे. या नाटकात संकर्षण कऱ्हाडे, अमृता देशमुख आणि प्रसाद बर्वे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.