Marathi Actor Visited Maha Kumbh Mela 2025 : यंदाचा महाकुंभ मेळा प्रयागराज येथे पार पडणार आहे. हा मेळा १३ जानेवारीपासून सुरू होऊन २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. १४४ वर्षांनंतर होणाऱ्या दुर्मीळ ग्रहस्थितीमुळे यंदाच्या कुंभमेळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या महाकुंभसाठी साधू-संत आणि जगभरातील लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. पुढील दीड महिन्यात तब्बल ३५ कोटी भाविक येतील, अशी शक्यता गृहीत धरूनच उत्तर प्रदेश सरकारने या महासोहळ्याची तयारी केली आहे.

सामान्य तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह सिनेविश्वातील अनेक कलाकार सुद्धा या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मराठी मालिकाविश्वात काम करणारा लोकप्रिय अभिनेता सुद्धा या भव्य सोहळ्यासाठी प्रयागराजमध्ये पोहोचला आहे. अभिनेत्याने याची खास झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो

‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजेच सौरभ चौघुले. या मालिकेत त्याने मल्हार ही मध्यवर्ती भूमिका साकारली होती. महाकुंभमेळ्याचं औचित्य साधत अभिनेता नुकताच प्रयागराजला पोहोचला आहे. सौरभ पोस्ट शेअर करत लिहितो, “प्रयागराजच्या पवित्र भूमीवर… २०२५ च्या १४४ वर्षाने येणाऱ्या महाकुंभ मेळ्याचा साक्षीदार होण्याचा संयोग, हे खरंच भाग्याचं आहे…” हर हर गंगे, हर हर महादेव!!”

सौरभने त्याच्या पोस्टमध्ये महाकुंभ मेळ्यातील काही फोटो देखील शेअर केले आहेत. नेटकऱ्यांनी त्याच्या पोस्टवर “खरंच भाग्यवान आहेस”, “हॅपी जर्नी रे, खूपच भाग्यवान आहेस असं पाहायला आणि अनुभवायला तुला मिळालं”, “खरंच लकी आहेस” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा : सरावादरम्यान क्रॅश झाली होती कार, तरीही जिंकली दुबईतील स्पर्धा; ‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारवर कौतुकाचा होतोय वर्षाव

हेही वाचा : चाळीशीत करिअरला खरं वळण! आधी ‘लक्ष्मी निवास’साठी दिलेला नकार, ऑडिशन झाली अन् मग…; हर्षदा खानविलकर म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दरम्यान, १६ जानेवारीला महाकुंभ मेळ्यात प्रसिद्ध गायक, संगीतकार शंकर महादेवन यांचा परफॉर्मन्स होणार आहे. त्यानंतर १७ जानेवारीला मराठीतील लोकप्रिय गायक महेश काळे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या महाकुंभमध्ये ज्येष्ठ गायक पद्मश्री सुरेश वाडकर, राहुल देशपांडे, देवकी पंडीत अशा दिग्गज गायकांच्या सुरांमध्ये भाविक दंग होणार आहेत. तर, शेवटच्या दिवशी मोहित चौहानच्या भावगीतांसह महाकुंभ मेळाव्याचा समारोप असणार आहे.