निर्माता साजिद खान मागच्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. साजिद खानने ‘बिग बॉस १६’मध्ये एंट्री घेतल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. सातत्याने त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले जात आहे. शर्लिन चोप्रा आणि इतर काही अभिनेत्रींनीही साजिद खानवर आरोप केले आहेत. एवढंच नाही तर साजिद खानला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्याची मागणी होताना दिसत आहेत. अशात आता एका मराठी अभिनेत्रीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने नुकतंच साजिद खानवर आरोप केले आहे. त्याने मला काम देण्याच्या बहाण्याने ऑफिसमध्ये बोलवलं आणि तिथे वेगळीच मागणी केली, असे तिने यावेळी म्हटले. तिच्या या आरोपानंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. तिने याबद्दल एक व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा : “त्याने दरवाजा बंद करून…” तब्बल १२ वर्षांनंतर साजिद खानवर प्रसिद्ध मॉडेलने केले गंभीर आरोप
जयश्री गायकवाड असे या मराठी अभिनेत्रीचे नाव आहे. जयश्रीने नुकतंच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे तिने आरोप केले आहेत. या व्हिडीओत ती म्हणाली, “आठ वर्षांपूर्वी मला एक दिग्दर्शक एका पार्टीमध्ये घेऊन गेला होता. त्याच ठिकाणी माझी आणि साजिदची ओळख झाली. त्यावेळी त्याने मला त्याच्या ऑफिसमध्ये भेटायला ये, असे सांगितले. मी एक चित्रपट बनवतो आहे. त्यात एखाद्या पात्रासाठी मला तुला घ्यायला आवडेल.
त्याने मला बोलवल्यामुळे मी त्याच्या ऑफिसला गेली. पण तिकडे पोहोचल्यानंतर त्यानं माझ्याशी गैरवर्तन करण्य़ास सुरुवात केली. त्याने मला स्पर्शही केला. त्याबरोबर माझ्यावर अश्लील भाषेत कमेंटही केली”, असेही तिने म्हटले.
आणखी वाचा- ‘बिग बॉस’च्या घरात साजिद खानच्या वर्तणूकीवरून नेटकरी संतापले; गोरी नागोरीशी वाद ठरला निमित्त
त्यावेळी साजिद मला म्हणाला होता की, ‘तू खूप सुंदर आहेस, पण मी तुला काय काम देऊ.’ त्यावर मी त्याला म्हणालेले, ‘सर मी काय करु शकते? मला अभिनय फार उत्तम येतो.’ त्यावर तो म्हणाला, ‘फक्त अभिनयाने काम चालणार नाही. मी जे बोलेन ते तुला करावं लागले.’ त्यानंतर मला प्रचंड राग आला आणि मी रागात निघून आले. मला त्यावेळी त्याचा खून करावा असं वाटलं होतं. पण मी तिथून निघून आले, असेही जयश्री म्हणाली.