‘बोल बजरंग बली की जय’, ‘तुझ्या घरात नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा’ अशा विविध गाण्यांवर ठेका धरत दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. मुंबई – ठाण्यासह विविध शहरांमध्ये गोविंदा पथकांतील गोविंदा गुरुवारी थिरकत होते. एकीकडे उंच दहीहंडी फोडून पारितोषिक मिळविण्यासाठी पथकांमध्ये चुरस लागली होती, तर दुसरीकडे गिरगावातील चाळीत पारंपारिक पद्धतीने दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

‘ती परत आलीये’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे कुंजिका काळविंट. या मालिकेत तिने सायली हे पात्र साकारले होते. नुकतंच कुजिंकाने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने गिरगावाच्या चाळीत कशाप्रकारे दहीहंडी साजरी केली जाते, याची झलक दाखवली आहे.
आणखी वाचा : कॅनडा कुमार म्हणून हिणवल्या जाणाऱ्या अक्षयला भारतीय नागरिकत्व मिळाले तेव्हा…

या व्हिडीओत तिने तिची तीन मजली चाळ दाखवली आहे. त्याबरोबर ढोल ताशांच्या तालावर अगदी मन भरुन नाचतानाही ती दिसत आहे. यात ती थरावर चढून दहीहंडीही फोडताना दिसत आहे. यावेळी पारंपारिक पद्धतीने चाळीतील मंडळी ठेका धरतानाही दिसत आहेत.

या व्हिडीओला कुंजिकाने ‘जगण्याचे दिवस’ असे कॅप्शन दिले आहे. विशेष म्हणजे अगदी उत्साहात आणि मोठ्या थाटामाटात तिच्या गिरगावातील चाळीत दहीहंडी साजरी केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : Video : न्यूयॉर्कमध्ये अमृता फडणवीसांच्या गाण्यांचा जलवा, परदेशी नागरिकांनी ऐकल्यावर केलं असं काही…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान कुंजिका काळविट ही सध्या ‘शुभविवाह’ या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत कुंजिका ही पौर्णिमा हे पात्र साकारत आहे. सध्या ती या मालिकेमुळे सातत्याने चर्चेत आहे. तिच्या या मालिकेला आणि पात्राला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे.