यंदाच्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यात टीम इंडियासमोर पाच वेळी विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलिया टीमचे कडवे आव्हान असेल. त्यामुळे कोणता संघ विश्वचषक २०२३ जिंकण्यात यशस्वी होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यासाठी अनेक कलाकार मंडळीही उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहेत.

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने गणपती बाप्पाकडे टीम इंडियाच्या विजयासाठी साकडं घातलं आहे. तिच्या या पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
आणखी वाचा : IND vs AUS Final Live, World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

Candidates winner D Gukesh reaction that Viswanathan Anand sir guidance is valuable
विशी सरांचे मार्गदर्शन मोलाचे! ‘कँडिडेट्स’ विजेत्या गुकेशची प्रतिक्रिया; मायदेशात जंगी स्वागत
Will MS Dhoni play in T20 World Cup 2024
Team India : एमएस धोनी टीम इंडियात परतणार? टी-२० विश्वचषकाबाबत ‘या’ माजी खेळाडूंचा मोठा दावा
Manoj Tiwary's statement on Shivam Dube
Team India : ‘विश्वचषकासाठी शिवम दुबेची निवड न झाल्यास CSK जबाबदार असेल..’ भारताच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य
IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज

प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्रामवर थेऊरच्या चिंतामणीचे दर्शन घेतानाचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोली कॅप्शन देताना तिने भारतीय टीमसाठी प्रार्थना केली आहे. श्री चिंतामणी गणपती – थेऊर. आजची match जिंकू दे रे देवा…, असे म्हटले आहे. तिची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : “बहिणीची काळजी घे…”, अभिषेक देशमुखने कानपिळीदरम्यान प्रसादला बजावले, उत्तर देताना अभिनेता म्हणाला “तू जितकी…”

दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना होत आहे. भारताने उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर मात करत आठव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. त्यामुळे आता आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये कोण विजेता ठरणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.