‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात झळकणारी अभिनेत्री रुचिरा जाधवची एक इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आहे. तिने ‘बिग बॉस १७’ मध्ये पतीबरोबर भाग घेणाऱ्या अंकिता लोखंडेबद्दल ही पोस्ट केली आहे. अंकिता व विकी जैन सध्या ‘बिग बॉस’च्या घरात आहेत. दोघेही आपण स्वतंत्र खेळ खेळत असल्याचं म्हणतात आणि त्यावरून त्यांची भांडणं पाहायला मिळत आहेत. अशातच रुचिराने केलेल्या पोस्टने लक्ष वेधलं आहे.

अंकिता लोखंडेची सुशांतशी ब्रेकअपनंतर झालेली ‘अशी’ अवस्था, म्हणाली, “मी विकीला म्हणायचे की तो…”

रुचिराच्या मते अंकिताचा पतीबरोबर ‘बिग बॉस १७’ मध्ये सहभागी होण्याचा निर्णय वाईट होता. “वाईट निर्णय, अंकिता…तू मला चुकीची सिद्ध करशील अशी मला आशा आहे आणि शेवटी तुझ्यासाठी सर्वकाही चांगलं होईल,” असं रुचिराने पोस्टमध्ये अंकिताचा एक फोटो शेअर करत म्हटलं आहे. बिग बॉसच्या घरात केल्यानंतर अंकिता व विकीमध्ये प्रचंड भांडणं होत आहेत. अशातच रुचिराची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.

View this post on Instagram

A post shared by Ruchira Jadhav (@ruchira_rj)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रुचिरा ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात रोहित शिंदेबरोबर सहभागी झाली होती. तो तिचा बॉयफ्रेंड होता. दोघे तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते, पण बिग बॉसच्या घरात काही गोष्टींमुळे त्यांच्यात दुरावा आला आणि तिथेच त्यांचं ब्रेकअप झालं होतं. दोघे शोच्या ग्रँड फिनालेमध्येही गेले नव्हते. तसेच आपल्यासाठी हे चाप्टर संपलंय, असं नंतर रुचिरा म्हणाली होती.