Master Chef India Season 7 : सोनी टेलिव्हिजनवर प्रसारित होणाऱ्या २ टीव्ही शोजची भरपूर चर्चा होताना दिसत आहे. एक म्हणजे ‘शार्क टँक इंडिया सीझन २’ आणि दूसरा म्हणजे ‘मास्टर शेफ इंडिया सीझन ७’. प्रेक्षक हा कुकिंग शो प्रचंड आवडीने बघतात. नुकतंच या शोमध्ये ७८ वर्षाच्या उर्मिला जमनादास असर यांनी भाग घेतला आणि प्रेक्षकांनी त्यांना भरपूर प्रेम दिलं. त्यांना प्रेमाने सगळे ‘उर्मिला बा’ म्हणून हाक मारतात.

उर्मिला यांचं ‘गुज्जूबेन ना नास्ता’ नावाचं यूट्यूब चॅनल प्रचंड लोकप्रिय आहे आणि त्यातूनच त्यांना खरी ओळख मिळाली. आता मास्टर शेफ इंडियामध्ये आल्यापासून त्यांची लोकप्रियता आणखीनच वाढली आहे. कमी वयात आपला पती आणि तीन मुलं गमावल्यानंतर त्यांनी हा सगळा डोलारा उभा केला आहे. यातूनच त्यांना आयुष्याकडे बघायचा एक नवा दृष्टिकोन मिळाला.

आणखी वाचा : Pathaan On OTT : शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘पठाण’ची ओटीटी प्रदर्शनाची तारीख आली समोर; वाचा कुठे आणि कधी पाहायला मिळणार?

लॉकडाउनच्या दरम्यान आपल्या नातवाच्या मदतीने उर्मिला यांनी २०२० मध्ये स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू केलं, या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या डिशेसची रेसिपी लोकांबरोबर शेअर केली आणि अवघ्या काही दिवसांतच लोकांनी त्यांच्या चॅनलला फॉलो करायला सुरुवात केली.

उर्मिला यांची अडीच वर्षांची मुलगी गच्चीवरुन पडल्याने तिचा मृत्यू झाला, यातून सावरत असतानाच त्यांच्या एका मुलाला हृदयविकाराचा झटका आला आणि अकाली त्याच्या मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या दुसऱ्या मुलाला ब्रेन ट्यूमर होता आणि पुढील काही दिवसांत त्यालाही मृत्यूने कवटाळले. इतकंच नव्हे तर एवढा संकटांचा डोंगर त्यांच्यावर कोसळला तरी त्यांनी त्यांच्या आजारी सासूच्या उपचारांची जबाबदारी घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या नातवाबरोबर उर्मिला बा सध्या राहतात आणि त्यांचा व्यवसाय सांभाळतात. ‘मास्टर शेफ सीझन ७’च्या भागात उर्मिला बा यांच्या संघर्षाबद्दल प्रेक्षकांना माहिती झालं. त्यांनी बनवलेल्या रेसिपीज ‘मास्टर शेफ इंडिया’चे जजेस रणवीर बरार, गरिमा अरोरा, विकास खन्ना यांनादेखील प्रचंड आवडल्या आणि त्यांनी खूप प्रशंसा केली.