‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlarla) ही मालिका प्रेक्षकांची लाडकी मालिका आहे. एजे व लीला यांच्यामधील कुरबुरी असो किंवा लीला व तिच्या सुनांमधील छोटी-मोठी भांडणं असो, लीलाच्या वडिलांचं तिच्यावरील प्रेम असो किंवा आजीचं तिला समजावून घेणं असो; प्रेक्षकांना ही मालिका भुरळ घालते. वेगळ्या धाटणीचे कथानक आणि कलाकारांचा सहज अभिनय यांमुळे या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याबरोबरच नवरी मिळे हिटलरला या मालिकेत सतत ट्विस्ट येताना दिसतात. आता झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला असून तो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

लीला नेमकं काय करणार?

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर नवरी मिळे हिटलरला मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये लीला व एजे यांच्यात संवाद सुरू असल्याचे दिसत आहे. लीला झोपण्याची तयारी करत आहे. तितक्यात एजे येतो व तिला म्हणतो, “तुला स्वत:ची काळजी कधीच घेता येणार नाही का? लीला एजेला म्हणते, “तुम्हाला माझ्याशी कधी गोड बोलता येत नाही का?” एजे तिला म्हणतो तुला वादच घालायचा आहे का? तो बोलत असतानाच लीला त्याच्या हातातून एसीचा रिमोट घेते आणि म्हणते, मला एसी १७ वर हवा आहे. मग मी तो १७ वरच ठेवला आहे. इतकच. या प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की एजे लीलाला म्हणतो, “हे बघ खूप उशीर झालाय. झोप आता. असे म्हणून तो त्याच्या बेडकडे येतो. लीलादेखील त्याच्या पाठीमागे येते. लीला एजे म्हणते, “एजे एजे तुम्हाला कळत नाही. जर भूताची गोष्ट अर्धवट टाकून झोपलं ना की ते भूत स्वप्नात येतं. लीलाचे हे बोलणे ऐकून एजे म्हणतो, “तू भूतापेक्षा काय कमी आहेस का लीला? एजेचे हे बोलणे ऐकल्यानंतर लीला मनातल्या मनात म्हणते, “मला भूत म्हणताय ना?आता भूतासारखीच तुमच्या मागे लागते मी. आता काहीही झालं तरी तुम्हाला माझ्या डोळ्यासमोरून हलूच देणार नाही. उद्याचा दिवस लीला आणि एजे, एजे आणि लीला. असा विचार करत लीला एकटीच हसताना दिसत आहे.

इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “एजेच्या मागे लागणार लीलाचं प्रेमळ भूत..”, अशी कॅप्शन दिली आहे.

हेही वाचा: Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ मधल्या ‘या’ आडनावावरुन करणी सेना आक्रमक, निर्मात्यांना थेट घरात घुसून मारण्याचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालिकेत एजे व लीला यांच्यामध्ये सतत काही ना काही कुरबूरी चालू असलेल्या दिसतात. आता लीला भूतासारखी एजेच्या मागे लागणार म्हणजे नेमके काय करणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.