झी मराठी वाहिनीवरील ‘पारू’ मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. कमी वेळात या मालिकेला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं. पारूची भूमिका साकारणारी शरयु सोनावणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय. तर खलनायिका पुर्वा शिंदे तिच्या अभिनयामुळे सतत चर्चेत असते.

पूर्वा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. मालिकेच्या सेटवर डान्स करतानाचे अनेक व्हिडीओ ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. आता मालिकेतील नायिकेचा आणि खलनायिकेचा ऑफ स्क्रिन बॉन्ड चर्चेत आहे. पूर्वा आणि शरयू “ए कंचन” या ट्रेंडिग गाण्यावर थिरकल्या आहेत. याचा व्हिडीओ पूर्वाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Wedding video bride dance after seeing his groom
नवरदेवाला मंडपात पाहून नवरीचा काय तो आनंद; VIDEO पाहून नेटकरी म्हणतात “नवरी भारी हौशी”
The women danced to the pink saree song wearing Nauvari
याला म्हणतात मराठमोळा डान्स! नऊवारी नेसून गुलाबी साडी गाण्यावर महिलांनी धरला ठेका… Viral Video पाहून युजर्स करतायत कौतुक
Paaru fame sharayu sonawane and gani reel on song atishay unique aalas on social media
“अतिशय वेगळा असा आळस…”, ‘पारू’ फेम शरयू सोनावणेने शेअर केला गणीबरोबर ‘खास’ व्हिडीओ; म्हणाली…
Paaru fame sharayu sonawane purva shinde prasad jawade dance on Angaaron sa Saami from pushpa
“अंगारो सा…” ‘पुष्पा २’ मधील गाण्यावर ‘पारू’ फेम शरयू, पूर्वा आणि प्रसादचा हटके डान्स, कलाकारांच्या हूकस्टेपने वेधलं लक्ष
aishwarya and avinash narkar dances on hoga tumse pyara kaun old song
“अरे हे कंचन…”, ४३ वर्षांपूर्वीच्या जुन्या गाण्यावर नारकर जोडप्याचा भन्नाट डान्स, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
puneri pati viral there is no love like father Emotional Slogan Written Behind puneri riksha Video
“आज पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी” रिक्षामागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुण्यातला VIDEO व्हायरल
aishwarya and avinash narkar dances on old bollywood song
१७ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर नारकर जोडप्याचा जबरदस्त डान्स; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
hrishikesh shelar shared photos with real life wife
अधिपतीच्या खऱ्या आयुष्यातील मास्तरीण बाईंना पाहिलंत का? लग्नाला पूर्ण झाली ७ वर्षे, शेअर केला फॅमिली फोटो

हेही वाचा… “पुस्तकांची दुकाने बंद…”, नीना गुप्ता यांनी ‘अ‍ॅनिमल’ आणि ‘लापता लेडीज’ या चित्रपटांवर व्यक्त केलं मत, म्हणाल्या…

शरयू पारू या भूमिकेच्या पोशाखावर दिसतेय. शरयूने परकर पोलकं घातलं आहे. तर पूर्वाने जांभळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. “तुमच्या जिवलग मित्राला हे सांगण्याची उत्कट आकांक्षा म्हणजे हे गाणं” असं कॅप्शन पूर्वाने या व्हिडीओला दिलं आहे. “तुम्हाला आमच्या आणखी रील्स एकत्र बघायच्या असतील तर आम्हाला कळवा” असंही पूर्वाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

पूर्वा आणि शरयूचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “हे खरोखर अनपेक्षित होतं” तर दुसऱ्याने लिहिलं, “समांतर विश्वातल्या पारू आणि दिशा “

हेही वाचा… “आम्हाला नावं ठेवता ना मग…”, नम्रता संभेरावने शेअर केला प्रसाद खांडेकरचा मजेशीर व्हिडीओ, म्हणाली…

“खूपच सुंदर, तुमच्या आणखी रील्स बघायला आवडतील” असं एका चाहतीने लिहिलं. “जबरदस्त डान्स केलाय” असं एका युजरने कमेंट करत लिहिलं.

नुकताच पारू या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या समोर आला आणि तो प्रोमो पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच बसला.  प्रोमोमध्ये पारू आणि आदित्यचं लग्न होतोना दाखवलं आहे आणि त्यातही खूप मोठा ट्वीस्ट असणार आहे असं सांगितलंय. ‘झी मराठी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ‘पारू’ मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. 

हेही वाचा… “आए हाए, ओए होए… बदो बदी” या व्हायरल गाण्याची पडली ऐश्वर्या नारकर, तितीक्षा तावडेला भुरळ; व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, पारू मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे व अभिनेता प्रसाद जवादे प्रमुख भूमिका साकारत आहेत. तर मुग्धा कर्णिक, पूर्वा शिंदे, विजय पटवर्धन, शंतनू गंगणे, अतुल कासवा, देवदत्त घोणे, अनुज साळुंखे, श्रुतकीर्ती सावंत यांच्या निर्णायक भूमिका या मालिकेत आहेत.