छोट्या पडद्यावरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत किर्ती आणि शुभमच्या हटके लव्हस्टोरीने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं होतं. या मालिकेमुळे किर्ती, शुभम, जिजी अक्का, भाऊ हे पात्र घराघरात पोहोचली. ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या मालिकेतील शुभम हे पात्र साकारणाऱ्या अभिनेता हर्षद अटकरीने मालिकेच्या आठवणीबद्दल सांगितले.

अभिनेता हर्षद अटकरी याने नुकतंच ई-टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या शूटींगच्या आठवणी, सध्या करत असलेले काम आणि भविष्यात त्याच्या असणाऱ्या योजना याबद्दल भाष्य केले. यावेळी तो म्हणाला, “मी यापूर्वी अनेक पात्र साकारली आहेत. पण ‘दुर्वा’ आणि ‘फुलाला सुंगध मातीचा’ या मालिकेतील शुभम या पात्राने मला घराघरात ओळख निर्माण करुन दिली. या भूमिकेसाठी मी फार मेहनत केली होती.”
आणखी वाचा : मराठी चित्रपटसृष्टी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील फरक काय? आदेश बांदेकरांचा लेक म्हणाला…

What Bacchu Kadu Said?
अमरावतीतल्या मैदान राड्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला अटक व्हावी म्हणून राणा दाम्पत्याने…”
Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

या मालिकेत मी साकारलेले पात्र हे एक साध्या आणि खऱ्या माणसाचे होते. त्याची सकारात्मकता ही जमेची बाजू होती. त्याची मला भविष्यात निश्चितच मदत होईल. माझ्या शुभम या पात्राला लोकांनी भरभरुन प्रेम दिले. ज्यांनी मला टीव्हीवर पाहिले त्या सर्वांचे मी आभारी आहे. मी लवकरच तुम्हा सर्वांना एका वेगळ्या भूमिकेत भेटेन, असेही हर्षद यावेळी म्हणाला.

यावेळी हर्षदला आता तू काय करतोस हे विचारले असता तो म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचे तर, मी आता काहीच करत नाही. मी सध्या माझा ‘मी टाईम’ एन्जॉय करत आहे. त्याबरोबर स्वतःवर लक्ष केंद्रित करत आहे. मी अडीच वर्षे सतत शूटिंग करत होतो. त्यामुळे त्या काळात मला काहीही करता आले नाही. एकही ब्रेक घेता आला नाही. कारण मी टेलिव्हिजन या माध्यमात काम करत होतो आणि त्यात तुम्हाला 24/7 काम करावे लागते. जेव्हा आमची मालिका संपली त्यानंतरच मी स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. त्याबरोबरच मी भविष्यातील भूमिकांसाठी स्वत:ला कशाप्रकारे तयार करता येईल, याबद्दलही विचार करत आहे.”

आणखी वाचा : “बाहेर आल्यापासून रोज…” आमदार शिवेंद्रराजे भोसलेंच्या भेटीनंतर किरण मानेंची पोस्ट चर्चेत

दरम्यान ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेआधी हर्षदने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘सारे तुझ्याचसाठी’, ‘अंजली’, ‘दुर्वा’ या मालिकांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. आता त्याला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते आतूर आहेत.