‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी घराघरांत लोकप्रिय झाली. मालिका विश्वात यश आजमावल्यावर अभिनेत्रीने अनेक चित्रपट व वेबसीरिजमध्ये काम केलं. ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने सूत्रसंचालिका म्हणून तिला एक वेगळी ओळख मिळवून दिली. अलीकडेच प्राजक्ता मुख्य भूमिकेत असलेला ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अभिनयाव्यतिरिक्त प्राजक्ताचे व्यवसाय, फोटोशूट याची सर्वाधिक चर्चा रंगते. सध्या अभिनेत्रीने शेअर केलेल्या अशाच एका फोटोशूटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : “गांभीर्याने घ्या!”, मुंबईतील प्रदूषणासंदर्भात केतकी माटेगावकरची पोस्ट, महापालिकेला विनंती करत म्हणाली…

प्राजक्ता माळीने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये निळ्या रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केला आहे. अभिनेत्रीने या लेहेंग्यावर शोभेल असा गळ्यात नेकलेस आणि कानातले घातले आहेत. प्राजक्ताच्या प्रत्येक फोटोंमध्ये ती तिच्या हास्याने मन जिंकते परंतु, या फोटोंमध्ये प्राजक्ता काहीशी शांत आणि थकल्याचं दिसून येत आहे. याचा खुलासा अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये केला आहे.

हेही वाचा : Video : “बायको म्हणजे गोंधळात टाकणारं…”, प्रसाद ओकची ‘ती’ पोस्ट चर्चेत; त्याची पत्नी कमेंट करत म्हणाली…

“मला फोटोशूटचा आलाय कंटाळा…इतका की यावेळी फोटो काढण्यासाठी खुर्चीवरून पण उठले नाही. डिझाईन म्हणाली पूर्ण फोटो पोस्ट करावा लागेल म्हणून शोधून शोधून चालू शूटमध्ये हे फोटो काढले. मला वाटतं प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात हा टप्पा येत असणार…”, असं कॅप्शन प्राजक्ता माळीने या फोटोंना दिलं आहे.

हेही वाचा : “घर छोटं आहे पण…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापला लागली म्हाडाच्या घराची लॉटरी, स्नेहल शिदम म्हणाली…

दरम्यान, प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या फोटोंना लक्ष वेधून घेणारं कॅप्शन देत असते. अभिनेत्रीच्या या फोटोशूटवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्चा वर्षाव केला आहे. काही नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला काळजी घे असा सल्ला देखील कमेंट सेक्शनमध्ये दिला आहे.